दिनविशेष १९ जुलै
दिनविशेष
दि. १९ जुलै
१. (१८२७) १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यातील आद्य क्रांतिकारक मंगल पांडे यांचा जन्म
१८५७ च्या उठावात प्राण त्याग करणारे मंगल पांडे हे पहिले भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते
२. (१९६९) इंदिरा गांधी यांनी देशातील १४ प्रमुख शेड्युल्ड बँकांचे राष्ट्रीयकरण केले
देशातील बँकाच्या लोकशाहीकरणाला त्यामुळे खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. देशाची अर्थव्यवस्था त्यावेळी खासकरून कृषीवर अवलंबून होती. अशावेळी कृषीवर सर्वाधिक परिणाम करणारा घटक म्हणजे बँकिंग व्यवस्था. देशातील बँकिंग व्यवस्था त्यावेळी खासगी उद्योगपतींच्या हाती होती. त्यामुळे सर्वसमान्य लोकांना कर्ज मिळत नव्हते. पीक कर्ज असो वा इतर प्रकारची कर्ज असो, शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना खासगी सावकारांकडे हात पसरण्याशिवाय कोणताही पर्याय नसायचा. खासगी सावकार सर्वसामान्यांचे शोषण करायचे. आधीच कर्जाच्या खाईत गेलेला सर्वसामान्य भारतीय आणखी खोलात जायचा.
या सर्वसामान्यांचा विकासच झाला नाही तर देशाच्या विकासाची गती मंदावणार ही गोष्ट लक्षात घेऊन आणि आर्थिक धोरणाच्या गरजेनुसार बँकिंग प्रणालीचे अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेतला. १९ जुलैचा दिवस भारतीय बँकिंग व्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. याच दिवशी देशातील बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९ जुलै १९६९ रोजी १४ खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले होते. त्यापूर्वी बहुतांश बँका या खासगी उद्योगपतींच्या हाती होत्या, त्यावर सरकारी नियंत्रण आलं
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment