दिनविशेष १७ जुलै
दिनविशेष
दि. १७ जुलै
* जागतिक इमोजी दिन
दरवर्षी १७ जुलैला जागतिक इमोजी दिन साजरा करतात. या दिवसाची सुरुवात २०१४ पासून झाली. ऑस्ट्रेलियातील जेरेमी बर्ज यांनी जागतिक इमोजी दिन साजरा करण्यास सुरुवात केली. आज इमोजींनी जगातील सर्व मेसेजिंग ॲप, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्यापून टाकले आहेत. चॅट, व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, सगळीकडे इमोजी दिसू लागले आहेत. व्यक्त होण्याच्या बाबतीत इमोजी हे शब्द आणि भावनांपेक्षा प्रभावी आहेत. इमोजींमुळे व्यक्त होणे अतिशय वेगवान झाले आहे. यामुळेच इमोजी वेगाने लोकप्रिय होत आहेत
* आंतरराष्ट्रीय न्यायदान दिन
आंतरराष्ट्रीय न्यायाची मजबुतीकरण यंत्रणा ओळखण्यासाठी तसेच पीडितांच्या हक्कांना न्याय देण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्याय दिन दरवर्षी १७ जुलैला साजरा केला जातो
१७ जुलै ला साजरा करण्यात येतो. यामागचे कारण असे की, २०१० रोजी कंपाला (युगांडा) मध्ये झालेल्या रूम विधान कायद्याचा आढावा परिषदेत राज्य पक्षांच्या असेंब्लीने १७ जुलै हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाचा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय न्यायाची मजबुतीकरण यंत्रणा ओळखण्यासाठी तसेच पीडितांच्या हक्कांना न्याय देण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक न्याय दिन दरवर्षी १७ जुलैला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिन हा रोम विधानचा ऐतिहासिक वापर आणि 1998 मध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाची नवीन यंत्रणा स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो
१. (१७९०) स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ते अॅडम स्मिथ यांचे निधन
ॲडम स्मिथ हे स्कॉटलंडचे एक तत्त्वज्ञ होते. राजकीय अर्थशास्त्राचा पाया त्यांनी रचल्याचे मानले जाते. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो मध्ये सामाजिक तत्त्वज्ञान विषयाचा अभ्यास केला. त्यांचे १७७६ साली प्रसिद्ध झालेले 'अॅन एन्क्वायरी इंटू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स' हे पुस्तक अर्थशास्त्राच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानले जाते
२. (१९३०) जातिव्यवस्थेला प्रखर नकार देऊन विद्रोह करणारे व मानवी मनाचा वेध आपल्या क्रांतिकारी लेखणीतून घेणारे मराठी साहित्यिक बाबुराव बागुल यांचा जन्म
ते आंबेडकरवादी साहित्यासाठी ओळखले जाणारे मराठी लेखक, कवी होते. विद्रोही आंबेडकरवादी कथांचे प्रमुख उद्गाते आणि प्रखर वास्तववादी कादंबरीकार तसेच शोषित, उपेक्षित, झोपडपट्टीतील, फुटपाथवरील भणंग जनजीवनाचे भेदक चित्रण करणारे लेखक म्हणून त्यांची ओळख होती. प्रभावी व विद्रोही भाषाशैली, जिवंत प्रसंगचित्रण, कारुण्य आणि क्रुरता रेखाटन हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होते. दलित साहित्य मध्ये मोठे योगदान देणारे एक प्रतिभावंत लेखक साहित्यिक म्हणून बाबूराव बागूल यांना एक नवी ओळख मिळालेले आहेत त्यांनी लिहिलेल्या कथा व कादंबऱ्या या गावकुसाबाहेर राहणाऱ्या समाजाच्या सामाजिक जाणिवांचं व वेदनांचं वर्णन करणारे आहेत स्त्रीप्रधान कथालेखन हा देखील त्यांच्या लिखाणाचा महत्त्वाचा भाग राहिलेला आहे सूड कथेमध्ये बाबुराव बागुल यांनी वाडी वस्तीवरील स्त्रीच्या हृदयद्रावक व तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगाचं चित्रण केलेला आहे या कथेतील स्त्री पात्र हे समाजातील स्त्रियांच्या शोषित पीडित स्त्रीच्या सामाजिक स्थितीचं चित्रण करणार आहे
जेव्हा मी जात चोरली होती, मरण स्वस्त होत आहे आणि सूड या त्यांच्या साहित्यकृती विशेष गाजल्या
३. (१९९२) मराठी, हिंदी, कानडी अभिनेत्री, गायिका शांता हुबळीकर यांचे निधन
त्यांनी 'माणूस'मध्ये गायलेले 'आता कशाला उद्याची बात' हे गाणे प्रसिद्ध झाले होते. त्यांनी याच नावाने आत्मचरित्र लिहिले आहे
४. (२०१२) समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांचे निधन
या भारतातील समाजवादी कार्यकर्त्या-राजकारणी होत्या. त्या महाराष्ट्र विधानसभेत आमदार होत्या. तसेच सहाव्या लोकसभेत या खासदार होत्या
सामान्यजनांच्या आणि महिलांच्या समस्यांबद्दलच्या विविध चळवळींचे यांनी नेतृत्व केले. पाणीवाल्या बाई, हंडेवाल्या बाई म्हणून त्या प्रसिद्ध होत्या
जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आणि महागाई यांचा सर्वाधिक सामना करणाऱ्या स्त्रीयांनी १९७२ मध्ये महाराष्ट्रात आपली संघटीत ताकद दाखवून दिली. समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांनी लाटणे मोर्चा काढला. ऐन दिवाळीत तेल, तूप, साखर, रवा, मैदा या वस्तू मिळत नव्हत्या रॉकेल महाग झाले होते. त्यामुळे मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी एकत्र येऊन हातात लाटणे घेतले आणि मोर्चे काढले. या आंदोलनाला यश मिळाले आणि महिलांच्या सामूहिक शक्तीचा अविष्कार जनतेला समजला
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment