दिनविशेष १६ जुलै

दिनविशेष

दि. १६ जुलै

१. (१९०९) स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्न अरुणा असफ अली यांचा जन्म

इ. स. १९४२ सालच्या चले जाव आंदोलनात गांधीजीनी राष्ट्रास 'करो वा मरो'चे आव्हान केले. त्या वर्षी ८ ऑगस्ट रोजी मुंबईच्या गवालिया टॅंक मैदानावर भरलेल्या सभेत अरुणा असफ अलींनी कॉंग्रेसचा झेंडा फडकवला होता

२. (१९८६) इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे तथा वा. सी. बेंद्रे यांचे निधन

इतिहास संशोधन आणि इतिहास लेखन ह्या क्षेत्रा मध्ये ज्यांनी अनन्य साधारण असे काम केले अशा दिग्गजांच्या यादीतील एक क्रियाशील व्यक्ती म्हणजे इतिहासकार वा. सी. बेंद्रे होय. वेगवेगळ्या विषयांची हाताळणी सविस्तरपणे करण्यात म्हणजेच वैविध्य आणि वैपुल्य या दोन्ही आघाड्यांवर वा.सी.बेंद्रे ह्यांची कामगिरी अतुलनीय आहे

३. (२०१९) आंबेडकरी चळवळीतील एक नेते, ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी राजा ढाले यांचे निधन

बौद्ध साहित्याचे ते गाढे अभ्यासक होते. ते दलित पॅंथरचे आक्रमक नेते होते. ही संघटना ज.वि. पवार, अरुण कृष्णाजी कांबळे आणि नामदेव ढसाळ यांनी स्थापन केली होती. त्या अगोदर ते भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या (भारिप) राजा ढाले गटाचे प्रमुख होते. त्यांनी फुले-आंबेडकरी विचाराचा पुरस्कार केला. त्यांनी सुरुवातीला 'प्रबुद्ध भारत'मध्ये लिखाण केले. पॅंथरमध्ये सामील होण्यापूर्वी ढाले 'लिटल मॅगझिन' चळवळीत सक्रिय होते. साहित्यिक भालचंद्र नेमाडे, वसंत गुर्जर, ज.वि. पवार, सतीश काळसेकर यांच्यासह त्यांनी 'लिटल मॅगेझिन'ची चळवळ सुरू केली होती


४. (२०१६) राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे निधन

एक कडक, शिस्तप्रिय, निश्चयी अधिकारी, एक संवेदनशील कवियित्री, लेखिका म्हणून त्यांची ओळख होती

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर