दिनविशेष १२ जुलै
दिनविशेष
दि. १२ जुलै
१. (१९८२) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना झाली
कृषी व ग्रामीण गैर कृषी विभागाला वित्तपुरवठा करून ग्रामीण भारताचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने संसदेच्या विशेष कायद्याने नाबार्डची स्थापना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व भारत सरकारच्या मालकीने करण्यात आली
२. (१९०९) प्रथितयश दिग्दर्शक बिमल रॉय यांचा जन्म
इ.स. १९५५ साली प्रदर्शित झालेला त्यांचा देवदास हा चित्रपट गाजला होता
३. (२०१३) चित्रपट अभिनेता प्राणकृष्ण सिकंद ऊर्फ प्राण यांचे निधन
त्यांनी भारतीय चित्रपटसुष्टीत ७०हून अधिक वर्षे काम करून ४०० हून अधिक चित्रपटांत अभिनय केलेला आहे. खलनायक म्हणून त्यांच्या भूमिका गाजल्या
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment