दिनविशेष ११ जुलै
दिनविशेष
दि. ११ जुलै
जागतिक लोकसंख्या दिन
जगभरात दरवर्षी ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले जाते आणि त्यावर विचारमंथन केले जाते. ११ जुलै १९८७ रोजी जगातील पाच अब्जावे बालक युगोस्लाव्हिया येथे जन्माला आले. यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येविषयी जनमानसात जागृती निर्माण झाली. अखेर युनोने पण याची दखल घेऊन १९८९ सालापासून हा दिवस जागतिक दिन म्हणून घोषित केला
१. (१८८९) आधुनिक मराठी कादंबरी, लघुकथांचे जनक, नाटककार, कुशल संपादक आणि व्याख्याते नारायण हरी आपटे यांचा कोरेगाव, सातारा आज जन्म
ते मराठी , कादंबरीकार, व्याख्याते आणि प्रकाशक होते. त्यांचे शिक्षण समडोळीला आणि नंतर सातारा येथे झाले. ते किर्लोस्कर खबर (पहिले उपसंपादक), उद्यान, लोकमित्र तसेच आल्हाद साप्ताहिक व मधुकर या मासिकाचे संस्थापक-संपादक होते. ‘आपटे आणि मंडळी’ या नावाने प्रकाशनगृह स्थापन केले. प्रकाशन करण्यासाठी स्वतःचा ‘श्रीनिवास छापखाना’ कोरेगाव येथे सुरू केला. २, ३ व ४ नोव्हेंबर १९६२ सातारा येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते
२. (१९२१) ज्येष्ठ साहित्यिक, 'तराळ-अंतराळ' या गाजलेल्या आत्मचरित्राचे लेखक, विचारवंत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू शंकरराव खरात यांचा जन्म
ते मराठी लेखक, कादंबरीकार व इतिहासकार होते. ते आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख लेखक होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सुद्धा कार्यरत होते. खरातांचा जन्म आटपाडी येथे झाला. 'तराळ-अंतराळ' हे त्यांचे आत्मचरित्र आहे. 'मी स्वतः महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा शिष्य आहे' असे ते नेहमी म्हणत. इ.स. १९५८ ते १९६१ या काळात प्रबुद्ध भारत या नियतकालिकाचे त्यांनी संपादनही केले. इ.स. १९८४ साली जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते
३. (२००३) दुनियादारी नावाची अफाट प्रसिद्ध कादंबरी लिहणारे कादंबरीकार व रहस्यकथाकार सुहास शिरवळकर यांचे निधन
शिरवळकरांनी १९७४ साली रहस्यकथा लेखनास सुरुवात केली. तेव्हापासून १९७९ सालापर्यंत त्यांनी २५० छोट्या मोठ्या रहस्यकथा लिहिल्या. १९८० सालापासून ते 'सामजिक कादंबरी' या साहित्यप्रकाराकडे वळले. 'लोकांना आवडेल ते' अशा मर्यादित अर्थाने त्याकडे न बघता, शिरवळकरांनी आपले साहित्य सवंग दर्जाचे होऊ न देता लेखन केले. रहस्यकथा, १७५ कादंबऱ्यांव्यतिरिक्त त्यांनी लघुकथाही लिहिल्या. या कथांचे पुढे कथासंग्रह झाले. त्यांनीकाही बालकथादेखील लिहिल्या. सुहास शिरवळकरांच्या निधनानंतर त्यांनी लिहिलेल्या कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यांच्या 'देवकी', 'दुनियादारी' या कथेवर मराठी चित्रपट बनला, तर 'कोवळीक' या त्यांच्या कादंबऱ्यांवर दूरचित्रवाणी मालिका झाल्या. ८० च्या दशकात त्यांच्या कादंबऱ्यांनी युवा पिढीला भुरळ घातली होती. ७९ कादंबऱ्या,१० कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत
४. (२००९) मराठी गीतकार, कवी शांताराम नांदगावकर यांचे निधन
ते मराठी गीतकार, कवी होते. त्यांनी अनेक भावगीते आणि काही मराठी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. अशी ही बनवाबनवी, अष्टविनायक, गंमतजंमत, धुमधडाका, नवरी मिळे नवऱ्याला, यांसारख्या मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले
५. (२०१७) ख्यातनाम व्यंगचित्रकार, लेखक, वक्ते मंगेश तेंडुलकर यांचे निधन
एक मराठी हास्य-व्यंग्य-चित्रकार असून त्यांनी काही विनोदी पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांचे अनेक ललित लेख नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांचीं अनेकदा प्रदर्शने भरत. त्यांच्या हस्ते पुस्तकांची उद्घाटने होत
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment