दिनविशेष ८ जून
दिनविशेष
दि. ८ जून
* जागतिक महासागर दिन
जागतिक महासागर दिन जगभर ८ जून रोजी पाळला जातो. २००८ सालापासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस अधिकृतरीत्या पाळण्याचे ठरविले. त्यापूर्वी १९८२ सालापासून कॅनडामध्ये तो साजरा होत असे. केनडा स्थित आंतरराष्ट्रीय संस्था महासागरांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहे, या संस्थेच्या पुढाकाराने सर्वप्रथम या दिवसाची सुरुवात झाली. वर्ल्ड ओशन नेटवर्क सारख्या विविध संस्था,मत्सयालये, प्राणिशास्त्र विषयात काम करीत असलेल्या संस्था; अशा महत्त्वाच्या संस्था यासाठी एकत्रितपणे योगदान देतात
जगभरातील महासागरांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस वार्षिक स्वरूपात साजरा केला जातो. महासागर हे संरक्षिले जावेत आणि नैसर्गिकदृष्ट्या असलेले त्यांचे मजत्व जपले जावे असा यामागे हेतू आहे. प्राणवायू, वातावरणाचे नियमन,अन्नाचा पुरवठा, औषधे आणि अन्य बाबींसाठी महासागरांचे स्थान महत्त्वाचे आहे. या निमित्ताने व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर महासागर रक्षणाची संधी घेतली जाते
१. (१८०९) अमेरिकन विचारवंत, राजकारणी थॉमस पेन यांचे निधन
ते एक ब्रिटिश-अमेरिकन लेखक तसेच मानवी हक्कांच्याबाबत भाष्य करणारे जगाच्या इतिहासातील पहिले विचारवंत होते. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते. मानवी अधिकारांचे शास्त्रशुद्ध विवेचन त्यांनी 'मानवी हक्क' या ग्रंथात केले आहे. स्वातंत्र्याची इच्छा बाळगणाऱ्या लोकांना या ग्रंथाने प्रेरणा दिली
२. (१९१०) लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक दिनकर केशव तथा दि. के. बेडेकर यांचा जन्म
बेडेकरांनी १९३६ च्या आसपाच कथा, तसेच राजकीय वाड्मयीन स्वरूपाचे लेखन करावयास सुरुवात केली होती. तथापि त्यांचे सर्व महत्त्वाचे लेखन १९५० ?नंतरच्या कालंखडातच झाले. नवकाव्य, नवकथा, नवे साहित्यविचार, सौंदर्यशास्त्रीय मीमांसा, विचारप्रणाली ह्यांचा हा काळ होता आणि ह्या काळाची आव्हाने व आवाहने साक्षेपाने स्वीकारुन बेडेकर समीक्षेच्या क्षेत्रात उतरले
३. (१९१७) भावगीत गायक गजाननराव वाटवे यांचा जन्म
ते मराठी गायक, संगीतकार होते. पुण्याच्या चौकांचौकांतून गणेशोत्सवाच्या काळात वाटव्यांवे भावगीत गायनाचे कार्यक्रम होत असत. जी.एन. जोशी हे मराठीतील पहिले भावगीत गायक असले तरी त्यांच्या काळातच आलेल्या गजानन वाटवे यांनी महाराष्ट्रात भावगीत या नव्याने जन्माला आलेल्या गायनप्रकाराचा खऱ्या अर्थाने प्रसार केला
४. (१९९५) रंगभूमी कलावंत एकपात्री प्रयोगकार राम नगरकर यांचे निधन
ते एक मराठी विनोदी नट होते. नगरकरांनी मराठी रंगभूमी चित्रपटांतून विनोदी भूमिका केल्या
कलापथकातील मैत्रीमुळे दादा कोंडके आणि नगरकर यांनी विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य सुरू केले. त्याचे महाराष्ट्रभर हजारो प्रयोग झाले. नंतर निळू फुले आणि नगरकर यांची कथा अकलेच्या कांद्याची आणि राजकारण गेलं चुलीत ही दोन लोकनाट्ये लोकप्रिय झाली. एकोणीसशे सत्तरच्या दशकात राम नगरकर यांचे हऱ्या नाऱ्या झिंदाबाद, बायांनो नवरे सांभाळा, लक्ष्मी आणि एक डाव भुताचा हे लोकप्रिय चित्रपट प्रदर्शित झाले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment