दिनविशेष २९ जून

दिनविशेष

दि. २९ जून

* राष्ट्रीय कॅमेरा दिवस  

जुन्या आठवणींना ताजे करण्यासाठी आणि आत्ताच्या क्षणांना चिरकाल टिकवण्यासाठीचे प्रभावी माध्यम म्हणून आज कॅमेरा कडे पाहिले जाते. फ्रांस चे जोसफ नीपेस ने हेलियोग्राफ़ (कॅमेरा) विकसित केला. १८२५ साली तो अस्तित्वात आला

१. (१८७१) मराठी नाटककार, विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म

ते मराठी मराठीतील आद्य विनोदी लेखक, नाटककार, कवी व समीक्षक होते. 'बहु असोत सुंदर, संपन्न की महा' या गीताचे रचनाकार म्हणून ते सुपरिचित आहेत. त्यांचा जन्म बुलडाणा येथे झाला. इयत्ता ५ वी मध्ये असताना त्यांनी सुख मालिका नावाचे नाटक लिहिले

२. (१९३४) रंगकर्मी, निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक कमलाकर सारंग यांचा जन्म

सखाराम बाइंडर व इतर अनेक नाटकांतील यांचा अभिनय विशेष नावाजला गेला. त्यांनी दिग्दर्शिलेली घरटे आमुचे छान, बेबी व जंगली कबूतर इत्यादी नाटके गाजली

३. (१९८१) मराठी साहित्यिक दि.बा. मोकाशी यांचे निधन

ते एक मराठी कथा-कादंबरी लेखक होते. नेहमीच्या जीवनानुभवावर आधारित ललित कथांप्रमाणेच मोकाशी यांनी गूढकथा, पिशाच्चकथा, रहस्यकथा यांसारख्या वेगळ्या वळणाच्या कथाही लिहिल्या

४. (२०१०) साताऱ्याचे सुपुत्र, विचारवंत, वक्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले यांचे निधन

साताऱ्यातील कलेढोण येथे त्यांचा जन्म झाला. साताऱ्यात त्यांनी काही काळ वकिलीही केली. फलटणच्या मुधोजी कॉलेज येथे तर्कशास्त्र, मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय शिकवण्यास १९५७ मध्ये त्यांनी प्रारंभ केला. अत्यंत कठीण असणारे हे विषय सहज, सोपे करून शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. याच कॉलेजमध्ये त्यांनी सुमारे २५ वर्षे प्राचार्यपदाची धुरा सांभाळली. १९८८-९१ या काळात त्यांनी औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुपद सांभाळले


#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर