दिनविशेष २३ जून

दिनविशेष

दि. २३ जून

* आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस

ऑलिम्पिक ही एक जागतिक, बहु-क्रीडा स्पर्धा आहे जी जगभरातील खेळाडूंना त्यांचे कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. हे उन्हाळी ऑलिंपिक आणि हिवाळी ऑलिंपिकमध्ये विभागले गेले आहे, ज्यामध्ये २०० हून अधिक देश ४०० हून अधिक खेळांमध्ये भाग घेतात. दरवर्षी २३ जून रोजी आयोजित आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस, ऑलिम्पिक खेळ आणि संपूर्ण खेळाची भावना साजरी करण्यासाठी जगाला एकत्र आणण्याचे उद्दिष्ट आहे. ऑलिम्पिक चळवळीच्या स्थापनेचे प्रतीक म्हणून हा दिवस जगभरात साजरा केला जातो

१८९४ मध्ये H.C.E. ऑलिम्पिक चळवळीची स्थापना बॅरॉनने केली आणि ऑलिम्पिक दिवस निवडण्यासाठी १८९४ मध्ये २३ जूनची निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवसाच्या सुरुवातीबद्दल बोलायचे तर, जॉर्जिओस डेमेट्रिओस यांच्या आदेशानुसार १९४८ मध्ये या दिवसाची सुरुवात झाली. इंग्लंडमधील लंडन शहरात १९४८ मध्ये ऑलिम्पिक चळवळीच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या दिवशी ऑलिम्पिक दिनाची स्थापना करण्यात आली

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाचा उद्देश ऑलिम्पिकचे महत्त्व आणि गरज वाढवणे हा आहे. ऑलिम्पिक दिनानिमित्त अनेक देशांमध्ये क्रीडा स्पर्धा, क्रीडा प्रात्यक्षिके, चर्चासत्रे, मॅरेथॉन, फिटनेस कार्यक्रम आणि क्रीडा सन्मान समारंभ इ.चे आयोजन केले जाते. या दिवसाच्या निमित्ताने लोकांना ऑलिम्पियनबद्दल माहिती मिळते आणि ऑलिम्पिक खेळांचे महत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो

* आंतरराष्ट्रीय विधवा दिन 

सर्व प्रदेशातील आणि संस्कृतीमधील सर्व वयोगटातल्या विधवा स्त्रियांसंदर्भात मुद्द्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर संबोधित करण्यासाठी २३ जून आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून पाळला जातो

कोणत्याही स्त्रिला आपल्या जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. मात्र काही कारणास्तव त्यांचा जोडीदार गमावल्याने अशा महिलांना एकाकी आयुष्य जगावे लागते. त्यामुळे विधवा महिलांचे प्रश्न मोठे भयंकर आहेत. विधवा महिलांचा प्रश्न फक्त भारतातच नाही, तर जगभरात गंभीर होत चालला आहे. त्यासाठी गेल्या सात वर्षापासून यूकेची लूम्बा फाउंडेशन ही संस्था जगभरातील विधवा महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात संयुक्त राष्ट्रांमध्ये मोहीम राबवत आहे. विधवांचे प्रश्न बिकट झाल्याने संयुक्त राष्ट्र संघातर्फे २३ जून २०११ हा दिवस आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो

त्यानुसार दरवर्षी विधवा दिनाचे औचित्य साधून या दिवशी विधवा महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. जगभरातील विधवा महिलांची स्थिती सुधारावी, त्यांना इतर महिलांसारखे सामान्य जीवन जगता यावे यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करण्यात येतात

१. (१९४२) मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील ख्यातनाम नाट्य व चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा जन्म

डॉ. जब्बार पटेलांनी अनेक नाटके व चित्रपट दिग्दर्शित केले. राजकीय सारीपाटावरचे शह-काटशह मांडणारे ' सामना, सिंहासन, गो. नी. दांडेकरांच्या कादंबरीवर आधारीत 'जैत रे जैत, मुक्ता, पु ल. देशपांडेनी लिहिलेला 'एक होता विदूषक' असे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. अनेक पैलू असणाऱ्या आंबेडकरांचे जीवन तीन तासाच्या चित्रपटात रेखाटणे ही अवघड बाब असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील चित्रपट केला. या चित्रपटाने त्यांना अनेक पुरस्कार मिळवून दिले. जवळपास सर्व प्रमुख भारतीय भाषांत हा चित्रपट रूपांतरित झाला आहे. इ.स १९७० च्या दशकात विजय तेंडुलकर यांच्या 'घाशीराम कोतवाल' या नाटकाचे जब्बार पटेलांनी दिग्दर्शन करून ते परत रंगमंचावर आणले होते. या नाटकाने आता विक्रमी प्रयोगांची नोंद केली आहे


२. (२००४) 'पाऊले चालती पंढरीची वाट' असे म्हणत अवघ्या महाराष्ट्राला पंढरीचा 'भक्ती मार्ग' दाखविणारे पहाडी आवाजाचे लोकगायक प्रल्हाद शिंदे यांचे निधन

ते एक मराठी लोकसंगीत गायक होते. त्यांनी अनेक गीते, भीमगीते, भक्तीगीते आणि काही हिंदी कवाल्या गायल्या आहेत. भक्ती गीताबरोबरच त्यांची लोकगीते आणि बुद्धगीतेही खूप गाजली

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर