दिनविशेष २२ जून
दिनविशेष
दि. २२ जून
१. (१८९६) नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर यांचा जन्म
ते मराठी चित्रपट-अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते होते. इ.स. १९२० साली त्यांनी सैरंध्री या मराठी चित्रपटाच्या लेखन-दिग्दर्शनाद्वारे चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. इ.स. १९२० च्या दशकापासून इ.स. १९६० च्या दशकापर्यंतच्या सुमारे ४५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पन्नासाहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले
श्यामची आई, महात्मा फुले हे मराठी तर डॉ. कोटनीस की अमर कहानी, नवरंग, दो आँखे बारह हाथ हे हिंदी चित्रपट त्यांनी केले. आचार्य अत्रे यांच्या सूचनेवरून त्यांनी रंगभूमीवर ‘झुंझारराव’ ही भूमिका केली
२. (१९३२) आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार अमरीश पुरी यांचा जन्म
१९७० ते २००५ या काळात अमरीश पुरी यांनी हिंदी भाषेसह अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्यांना साकारलेले खलनायक आजही लोकांच्या लक्षात आहेत
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment