दिनविशेष २१ जून
दिनविशेष
दि. २१ जून
* जागतिक संगीत दिवस
संगीत हे समुद्राप्रमाणे अथांग आहे. आपण जितके खोल जाऊ तितक्या नवनवीन गोष्टी आपल्याला उमगत जातात. जगात जेव्हापासून नादाची निर्मिती झाली असेल तेव्हापासूनच संगीत निर्माण झाले आहे. जगात संगीताचे विविध प्रकार आहेत. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. सर्वांत प्रथम जागतिक संगीत दिनाची सुरूवात फ्रान्समध्ये झाली. फ्रान्समध्ये या दिनाला 'फेटे डेला म्युसिक्यू' या नावाने देखील ओळखले जाते. २१ जून १९८२ रोजी प्रथम जागतिक संगीत दिवस साजरा करण्यात आला. फ्रान्समधील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मॉरीश फ्लेरेट यांनी तेथील सांस्कृतिक विभागासाठी या दिनाची सुरुवात केली होती. अर्जेंटिना, ब्रिटेन, लक्जमबर्ग, जर्मनी, चीन, लेबनॉन, कोस्टा रिका या देशांसोबत भारतात देखील हा दिन साजरा केला जाते
* (२०१५) जागतिक योग दिन
भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो; शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला
१. (१९१२) भारतीय लेखक व नाटककार विष्णू प्रभाकर यांचा जन्म
अधर्नारीश्वर या कादंबरीसाठी साहित्य कादमीचा पुरस्कार (१९९३) देऊन त्यांना गौरविण्यात आले
२. (१९२३) मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक सदानंद रेगे यांचा जन्म
अद्भुताकडे झुकणारी विमुक्त, स्वैर चमकदार कल्पनाशक्ती, सर्वस्पर्शी वृत्ती आणि उपहास-उपरोधाची छटा असलेला विनोद ही त्यांच्या काव्याची महत्वाची वैशिष्ट्ये होत. जीवनातील वैफल्य. नैराश्य आणि एकाकी पणाचे तीव्र दुःख त्यांच्या काव्यातून विलक्षण उत्कटतेने व्यक्त झालेले दिसते. यांखेरीज तरल संवेदनशीलता, निसर्गप्रेम आणि नवनवीन शब्दसंहतींचा वापर ही वैशिष्ट्येही त्यांच्या काव्यात दिसतात. ‘चंद्र सावली कोरतो’ सारख्या त्यांच्या कथांमधून जीवनातील विकृतीचे चमत्कृतीचे आणि अनेक विलक्षण अनुभवांचे चित्रण अतीव वेधकतेने आणि समरसतेने केलेले दिसते. मुंबई येथे १९८१ मध्ये भरलेल्या समांतर मराठी साहित्य संमेलनातील कविसंमेलनाचे अध्यक्ष पद त्यांनी भूषविले होते
३. (१९५८) भारतीय अभिनेत्री यांचा जन्म
त्या मराठी व हिंदी चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री होत्या. सुमारे चार दशकांचा मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनुभव असलेल्या रीमा यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले. मैने प्यार किया, हम आपके हैं कौन, हम साथ साथ हैं यासारख्या हिंदी चित्रपटातले तसेच तू तू मै मै या हिंदी दूरदर्शन मालिकेमधील त्यांचे काम गाजले
४. (१९८४) मराठी चित्रपट, नाट्य अभिनेते अरुण सरनाईक यांचे निधन
अरुण सरनाईक हे एक रूबाबदार अभिनेते होते. त्यांचा डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित सिंहासन' मधील मुख्यमंत्री आजही लोकप्रिय आहे. ते उत्तम गायक होते. "घरकुल' या चित्रपटासाठी सी. रामचंद्र यांनी त्यांच्याकडून "पप्पा सांगा कुणाचे' हे अजरामर गीत गाऊन घेतले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment