दिनविशेष २० जून
दिनविशेष
दि. २० जून
जागतिक शरणार्थी दिन
दरवर्षी २० जून हा दिवस 'जागतिक शरणार्थी दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जगभरातील शरणार्थींना मदत केली जाते. तसेच, त्यांच्या स्थितीबाबत जनजागृती केली जाते
१. (१८६९) किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक मराठी उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म
इ.स. १८८८ साली त्यांनी बेळगावात सायकल दुरुस्तीचे दुकान थाटत व्यावसायिक क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले. शेतीसाठी त्यांनी बनवलेले लोखंडी नांगर हे पुढे विस्तारलेल्या किर्लोस्कर समूहाचे पहिले उत्पादन होते. किर्लोस्करवाडी येथे त्यांनी इ.स. १९१० साली कारखाना काढला; तसेच कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी औद्योगिक वसाहत स्थापन केली
२. (१९५२) भारतीय लेखक आणि कवी विक्रम सेठ यांचा जन्म
हे इंग्रजी साहित्यिक आहेत. यांना पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक सन्मान मिळालेले आहेत
३. (१९८७) भारतातील आद्य पक्षिशास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी सलीम अली यांचे निधन
ते भारतातील आद्य पक्षिशास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी होते. सलीम अली यांनी भारतातील ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतातील पक्ष्यांचा आढळ, त्यांच्या सवयी, पक्ष्यांच्या विविध जाती आणि जातींमधील वैविध्य यांचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या ह्या कार्याने भारतात हौशी पक्षिनिरीक्षक बनण्याची परंपरा चालू झाली. भारतातील हे पक्षी निरीक्षक सलीम अली यांना आद्य गुरूमानतात. त्यांना birdman of India असे ही संबोधले जाते
४. (१९९७) मराठीतले शायर भाऊसाहेब पाटणकर उर्फ जिंदादिल यांचे निधन
हे मराठी भाषेतील नामवंत गझलकार शायर व कवी होते. पाटणकरांनी शायरीच्या सादरीकरणाचे कार्यक्रम पुणे, नाशिक, मुंबई इत्यादी महाराष्ट्रातल्या शहरांत व महाराष्ट्राबाहेरील हैदराबाद वगैरे शहरांतही केले. त्यांच्या मैफिलींना रसिकांची भरपूर दादही मिळाली
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment