दिनविशेष १९ जून

दिनविशेष

दि. १९ जून

* जागतिक सिकल / अनेमिया दिवस

सिकल’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ म्हणजे गवत कापण्याचा विळा किंवा कोयता. ‘सिकल सेल अ‍ॅनिमिया’ हा लाल रक्तपेशींमधील दोषामुळे होणारा आजार आहे. हा आजार पूर्णत: आनुवांशिक आहे. कोणत्याही सूक्ष्म जंतू किंवा विषाणूमुळे किंवा पोषक आहार न घेतल्यामुळे हा आजार होत   नाही. १९ जून हा दिवस जागतिक सिकल सेल दिवस म्हणून पाळला जातो. 

१. (१९६६) शिवसेना या मराठी राजकीय पक्षाची स्थापना 

शिवसेना हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबई मध्ये मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली


२. (१९७०) भारतीय राजकारणी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष, भारतीयांचे प्रेरणास्थान राहुल गांधी यांचा जन्म

 ३. (२०२१) कथाकार, प्रवासवर्णनकार व विनोदी लेखक रमेश मंत्री यांचे निधन 

त्यांनी जगभर भ्रमंती करून अनेक पुस्तके लिहिली. १९७९ या एकाच वर्षात त्यांची तब्बल ३४ पुस्तके प्रकाशित झाली. 'महानगर' ही त्यांची स्वानुभवावर बेतलेली कादंबरी प्रचंड लोकप्रिय झाली

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर