दिनविशेष १४ जून

दिनविशेष

दि. १४ जून

जागतिक रक्तदान दिन

रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. जागतिक रक्तदाता दिनाचे उद्दिष्ट सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादनांच्या गरजेबद्दल जागतिक जागरूकता वाढवणे आहे. हा दिवस ऐच्छिक, न चुकता रक्तदात्यांचे जीवन वाचवणाऱ्या भेटवस्तूंसाठी आभार मानण्याचा एक प्रसंग आहे. 

रक्तदात्याला रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने तसेच रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी २००४ पासून जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिवस साजरा करण्यात येतो. रक्तासह जटिल वैद्यकीत आणि शस्त्रक्रिया प्रक्रियेस समर्थन देता येते


१. (१९१६) मराठी नाटककार नाट्यदिग्दर्शक गोविंद बल्लाळ देवल यांचे निधन

ते आद्य मराठी नाटककार होते. त्यांच्या मृच्छकटिक, संगीत शारदा आणि संशयकल्लोळ या नाटकांना मराठीत मानाचे स्थान आहे

२. (१९२२) हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक के. आसिफ यांचा जन्म

हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील मैलाचा दगड मानल्या गेलेल्या मुघल-ए-आझम (इ.स. १९६०) या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन व पटकथालेखन त्याने केले

३. (१९६९) प्रसिद्ध जर्मन टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफ यांचा जन्म

स्टेफी ग्राफ यांनी जगातील महत्त्वाच्या ग्रँड स्लॅम स्पर्धांंमध्ये २२ वेळा विजेतेपद पटकविले : सात वेळा विंबल्डन, सहा वेळा फ्रेंच ओपन, चार वेळा ऑस्ट्रेलिअन ओपन, पाच वेळा अमेरिकन ओपन

१९८८ साली स्टेफीने सर्व ग्रँड स्लॅम स्पर्धा तसेच त्या वर्षीच्या सेऊल ऑलिंपिकमधील टेनिसमधील महिला एकेरीचे विजेचेपद जिंकून 'गोल्डन ग्रँड स्लॅम' पूर्ण केले

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर