दिनविशेष १२ जून
दिनविशेष
दि. १२ जून
जागतिक बालकामगार विरोधी दिन
जगामध्ये बालकांना कामगार म्हणून राबविले जाऊ नये आणि बालकांना सर्वांगीण विकासाचा हक्क मिळालाच पाहिजे. हा जागतिक बालकामगार विरोधी दिनामागचा मुख्य उद्देश आहे. जागतिक बालकामगार विरोधी दिनाची सुरुवात आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (आयएलओ) १२ जून २००२ रोजी केली. बाल कामगारांच्या जागतिक स्थितीवर लक्ष केंद्रित करणे आणि बालमजुरी पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे या उद्देशाने जागतिक बालकामगार विरोधी दिन साजरा करण्यात येतो
भारतात बाल कामगारांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. भारतात बाल कामगारांची सुद्धा तस्करी केली जाते. यासाठी १९८६ मध्ये पहिला बाल कामगार बंदी आणि नियमन कायदा करण्यात आला. या कायद्यानुसार १४ वर्षाखालील मुलांना मजुरी करणे बेकायदेशीर ठरविले गेले. याद्वारे भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद २३ नुसार मुलांना धोकादायक उद्योग आणि कारखान्यांमध्ये काम करण्यास परवानगी देत नाही. तर कलम ४५ अंतर्गत देशातील सर्व राज्यांना १४ वर्षाखालील मुलांना मोफत शिक्षण देणे बंधनकारक करण्यात आले आहे
१. (२०००) मराठी लेखक, कवी, नाटककार आणि अभिनेते पुरूषोत्तम लक्ष्मण तथा पु.ल. देशपांडे यांचे निधन
ते एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक होते. ते एक प्रसिद्ध अभिनेते, पटकथालेखक, संगीतकार आणि गायकही होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून ते नेहमी पु.ल. म्हणून ओळखले जातात
पु. ल. देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत काम केले
त्यांच्या पुस्तकांची इंग्रजी आणि कन्नडसारख्या बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरे झालेली आहेत. दूरदर्शन सुरू झाल्यावर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची पहिली मुलाखत देशपांडे यांनी घेतली होती. भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ २००२ साली त्यांच्या नावाचे टपाल तिकीट प्रकाशित केले. त्यांना भारतातील चौथा आणि तिसरा सर्वोच्च पुरस्कार अनुक्रमे पद्मश्री (१९६६) आणि पद्मभूषण(१९९०) साली देण्यात आला
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment