दिनविशेष ११ जून
दिनविशेष
दि. ११ जून
१. (१८९७) क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म
ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. त्यांनी १९१८ च्या मैनपुरी कांडात आणि १९२५ च्या काकोरी कांडात भाग घेतला आणि ब्रिटिश साम्राज्यविरोधी विरोधात लढा दिला
२. (१९४८) माजी केंद्रीय मंत्री, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा जन्म
१९९० ते १९९७ या काळामध्ये त्यांनी बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. ते २००४ ते २००९ या कालखंडामध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री देखील होते
३. (१९५०) बाल साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ सानेगुरुजी यांचे निधन
ते मराठीतले एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक होते. समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला.सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला, तो शेवटपर्यंत मिळाला नाही. अखेर साने गुरुजींनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले
४. (१९८३) भारतीय उद्योगपती घनश्यामदास बिर्ला यांचे निधन
ते भारतीय उद्योजक व प्रभावशाली बिर्ला कुटुंबियांपैकी एक होते
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment