दिनविशेष ७ मे

दिनविशेष

दि. ०७ मे

विश्व ऐथलेटिक्स दिवस

आंतरराष्ट्रीय हौशी ऍथलेटिक फेडरेशन (IAAF) ने १९९६ मध्ये खेळाच्या शारीरिक आणि मानसिक महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक ऍथलेटिक्स दिनाची स्थापना केली. दरवर्षी ७ मे रोजी (IAAF) लोकांना त्यांचे आरोग्य राखण्यासाठी खेळ करण्यास प्रवृत्त करण्यासाठी विश्व ऐथलेटिक्स दिवस साजरा करतो

जागतिक ऍथलेटिक्स दिन हा संदेश देतो की प्रत्येक वयोगटातील लोकांनी त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फिटनेस क्रियाकलापांमध्ये भाग घेतला पाहिजे. या दिवसाचा उद्देश क्रीडा क्षेत्रातील प्रमुख कामगिरीवर प्रकाश टाकणे देखील आहे

१. (१८६१) पहिले नोबेल भारतीय पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म

ते एक चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार आणि समाजसुधारक होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्य व संगीतात आमूलाग्र बदल घडून आला

अतिशय लोकप्रिय कविता असलेल्या गीतांजलीचे ते कवी होते, ज्याचे वर्णन 'अगदी संवेदनशील, ताजे आणि सुंदर' कविता असे केले जाते. ते १९१३ मध्ये नोबेल पारितोषिक जिंकणारे जगातील पहिले गैर-युरोपियन आणि साहित्यातील पहिले गीतकार बनले. टागोरांच्या काव्यात्मक गाण्यांकडे आध्यात्मिक आणि पारंपारिक म्हणून पाहिले गेले

२. (१८८०) भारतरत्न पांडुरंग वामन काणे यांचा जन्म

ते एक उल्लेखनीय भारतशास्त्रज्ञ, संस्कृत विद्वान, भारतीय कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक होते. १९६३ मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्राप्त झाला.

३. (२००१) विख्यात मराठी कादंबरीकार, लेखिका मालतीबाई बेडेकर तथा विभावरी शिरूरकर यांचे पुणे येथे निधन

या मराठीतल्या आद्य स्त्रीवादी लेखिका समजल्या जातात. त्यांनी सहा कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, सहा प्रबंध, प्रौढ साक्षरांसाठी चार पुस्तके, पाच नाटके, एक चित्रपटकथा लिहिली तसेच पाच इंग्लिश पुस्तकांची मराठी भाषांतरे केली

मालती बेडेकर यांनी आपले काही लिखाण विभावरी शिरुरकर ह्या नावाने लिहिले आहे. ते लिखाण कृष्णाबाई मोटे यांचे पती ह.वि. मोटे यांनी प्रकाशित केले. या पुस्तकांनी महाराष्ट्रात त्याकाळी प्रचंड खळबळ उडाली होती. ही पुस्तके लिहिण्यापूर्वी श्रद्धा, बी.के., कटुसत्यवादिनी, एक भगिनी किंवा बाळुताई खरे या नावांनीही मालतीबाईंनी लेखन केले आहे

प्रकाशित साहित्य अलंकार-मंजूषा, कळ्यांचे निःश्वास, घराला मुकलेल्या स्त्रिया   व इतर

४. (२००२) मराठी अस्मितेच्या व विचार स्वातंत्र्याच्या बुलंद पुरस्कर्त्या, जेष्ठ लेखिका, तत्त्ववेत्या आणि निसर्गाच्या अभ्यासक दुर्गा भागवत यांचे मुंबई येथे निधन

त्या मराठी लेखिका होत्या. वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारात त्यांचे मोठे योगदान आहे. यांत लोकसाहित्य, बालसाहित्य, बौद्धसाहित्य, कथा, चरित्र, ललित, संशोधनपर, समीक्षात्मक, वैचारिक लेखन यांचा समावेश होतो. त्यांना फ्रेंच, जर्मन, इंग्रजी, संस्कृत, पाली या भाषा चांगल्या अवगत होत्या. त्यांचे संस्कृत, पाली आणि इंग्लिश भाषेमध्येही लेखन आहे

सुस्पष्ट पामाणिक विचार, छोटी छोटी वाक्ये, नादमय शब्द आणि अर्थातील सुबोधता हे दुर्गाबाईंच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. दुर्गाबाईंच्या लेखनात भारतातील सांस्कृतिक, पौराणिक, सामाजिक जीवनातले अनेक संदर्भ अभ्यासपूर्वक नोंदविलेले दिसतात. अभ्यास आणि लिखाण हे त्यांचे आस्थेचे विषय होते. म्हणूनच त्यांच्या लिखाणात संशोधन, विद्वत्ता आणि माहितीचा प्रचंड साठा या त्रयींचा अपूर्व संगम आढळतो. त्यांच्या लिखाणात स्पष्ट आणि प्रामाणिक विचारांबरोबरच कवी मनाची कोमलता आढळते

अनुवादित साहित्य
'पैस', 'ॠतुचक्र', 'डूब', अशा ललित लेखांच्या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. बाणभट्टाची कादंबरी, जातककथा, यांचा अनुवाद करणाऱ्या दुर्गाबाईंनी थोरो या अमेरिकन विचारवंताच्या पुस्तकाचा वॉल्डनकाठी विचारविहार नावाचा अनुवादही केला. रवींद्रनाथ टागोरांच्या 'गीतांजली' चा संस्कृतात अनुवाद करण्याचे कौतुकास्पद कार्य दुर्गाबाईंनी केले. त्यांनी भाषांतरित केलेली आणि सरिता प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेली 'लोककथामाला' मराठीतील लोककथा आणि बालकथा यांमधला महत्त्वाचा ठेवा आहे

१९७५ साली इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीला स्पष्ट विरोध करणाऱ्या म्हणून दुर्गाबाई विशेष मान्यता पावलेल्या आहेत 


#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर