दिनविशेष ५ मे
दिनविशेष
दि. ०५ मे
जागतिक व्यंगचित्र दिन
१८९५ मध्ये पहिले रंगीत व्यंगचित्र द यलो कीड प्रकाशित झाले होते. त्याची आठवण आणि व्यंग चित्रकलेचा गौरव म्हणून ५ मे हा दिवस जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जगभरात व्यंगचित्र आणि व्यंगचित्रकारांना मानचे स्थान आहे. भारतीय समाजावरही व्यंगचित्राचा फार मोठा प्रभाव पडलेला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आर. के. लक्ष्मण ही दोन नावे त्यासाठी पुरेसी आहेत. व्यंगचित्रकार या पेशाला आर.के. लक्ष्मण यांनी ओळखच नव्हे, तर प्रतिष्ठा मिळवून दिली
१. (१८१८) साम्यवादी विश्वक्रांतीचे पुरस्कर्ते कार्ल मार्क्स यांचा जन्म
१९ व्या शतकातील एक जर्मन अर्थशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ होते. त्यांनी अनेक विषयांवर लिखाण केले पण त्यांचे वर्ग संघर्षावरील लिखाण हे जास्त प्रसिद्ध आहे. कार्ल मार्क्स यांनी "दास कॅपिटाल" या ग्रंथाचा पहिला खंड इ.स. १८६७ मध्ये प्रसिद्ध केला
२. (१९१८) त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी तथा निसर्गकवी यांचे निधन
ते मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी होते. इ.स. १९०७ मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्या संमेलनात ठोंबरेंना बालकवी ही उपाधी दिली
३. (१९८९) उद्योगपती, पद्मभूषण नवल टाटा यांचे निधन
४. (२००६) ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक नौशाद अली यांचे निधन
नौशादजी यांनी अनेक बॉलीवूड चित्रपटांना संगीत दिले. त्यांनी चित्रपट संगीतात हिंदुस्तानी शास्त्रीय रागदारीचा वापर केला. आजवरच्या सर्वश्रेष्ठ भारतीय संगीतकारांमध्ये नौशादजी यांचा उल्लेख केला जातो
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment