दिनविशेष ६ मे

दिनविशेष

दि. ०६ मे

१. (१८६१) भारतीय राजनीतीज्ञ मोतीलाल नेहरु यांचा जन्म

पंडित मोतीलाल नेहरू हे पंडित जवाहरलाल नेहरूंचे वडील होते. ते अलाहाबाद येथील एक नामवंत वकील होते. पुढे त्यांनी वकिली सोडून दिली व भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लक्ष घातले. १९२२ साली त्यांनी देशबंधू चित्तरंजन दास व लाला लजपत राय ह्यांच्याबरोबर काँग्रेस पक्षांतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली. १९२८ साली कोलकाता येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. तसेच १९२८मध्ये काँग्रेस पक्षाने भारताची भावी राज्यघटना बनवण्यासाठी नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. ह्या समितीने नेहरू रिपोर्ट सादर केला

२. (१९२२) सामाजिक सुधारणांचे कृतीशील पुरस्कर्ते, कला, नाटक, संगीत यांचे प्रोत्साहक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे निधन

राजर्षी शाहू महाराज हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. १८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते

ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास 'फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र' असे म्हणतात


३. (१९४३) लेखिका वीणा चंद्रकांत गावाणकर यांचा जन्म

ह्या मराठी लेखिका आहेत. त्यांची आजवर अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांचा मुख्य विषय नावाजलेल्या व्यक्तींचे चरित्रलेखन आहे

४. (१९६६) उदारमतवादी समाजसुधारक, नेमस्त पुढारी आणि शिक्षणज्ज्ञ रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचे निधन

ते केंब्रिज विद्यापीठाचा वरिष्ठ रॅग्लर हा किताब पटकावणारे पहिले भारतीय होत. हे पेशाने गणिताचे प्राध्यापक होते. आपल्या यशस्वी कारकिर्दीत त्यांनी काही विद्यापीठांचे कुलगुरुपद, तसेच ऑस्ट्रेलियात ब्रिटिश भारताच्या वकिलातीतील उच्चायुक्तपदही भूषवले

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर