दिनविशेष ३१ मे
दिनविशेष
दि. ३१ मे
जागतिक तंबाखू विरोधी दिवस
दरवर्षी ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी १९८७ मध्ये हा दिवस पाळण्यास सुरुवात केली. या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट तंबाखूचे दुष्परिणाम, त्यामुळे होऊ शकणारे रोग आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी जागरुकता निर्माण करणे हा आहे. या दिवशी, तंबाखू वापरण्याचे धोके, तंबाखू उत्पादकांच्या व्यवसाय पद्धती आणि तंबाखूच्या साथीचा सामना करण्यासाठी डब्लूएचओने उचललेल्या पावलांकडे जागतिक पातळीवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो. निरोगी जीवन जगण्यासाठी ते काय करू शकतात याबद्दल लोकांना शिक्षित करण्यासाठी योग्य महत्त्व दिले जाते
१. (१७२५) राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म
त्या भारतातील, माळव्या प्रदेशाच्या 'तत्त्वज्ञानी माहाराणी' म्हणून ओळखल्या जात. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले होते. अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या
२. (१९१०) मराठी बालसाहित्यात अत्यंत गाजलेल्या फास्टर फेणे या कथानायकाचे शिल्पकार, बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत यांचा जन्म
हे बालसाहित्य लिहिणारे मराठी कादंबरीकार, पत्रकार, भाषांतरकार, कादंबरीकार आणि विनोदी लेखक होते. ते 'भा.रा. भागवत' या नावानेच प्रसिद्ध होते. मराठीतील पहिल्या बाल-कुमार साहित्य संमेलनाचे (१९७६) अध्यक्षपद त्यांनी भूषवले. त्यांनी लहान मुलांसाठी - विशेषतः कुमार वयोगटासाठी - अनेक कादंबऱ्या व साहसकथा लिहिल्या. तसेच अनेक कथा, कादंबऱ्या व विज्ञानकथा यांची इंग्रजीतून भाषांतरे आणि रूपांतरे केली. त्यांनी 'ज्यूल व्हर्न' या प्रसिद्ध व आद्य-विज्ञानकथालेखकाचे संपूर्ण लेखन मराठीत भाषांतरीत वा रूपांतरित केले. त्यांनी निर्माण केलेले फास्टर फेणे आणि बिपिन बुकलवार हे नायक इ.स. १९७० आणि १९८० च्या दशकात प्रसिद्धी पावले. मुलांसाठी त्यांनी 'बालमित्र' हे नियतकालिक चालवले; तसेच 'पुस्तकहंडी'सारखे उपक्रमही केले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment