दिनविशेष ४ मे
दिनविशेष
दि. ०४ मे
आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस
अग्निशामक समुदाय पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात. आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन दरवर्षी ०४ मे रोजी जगभरात साजरा केला जातो. याची सुरुवात १९९९ साली झाली. तेव्हापासून हा दिवस अग्निशमन दलाच्या जवानांच्या बलिदानाचे प्रतीक आणि सन्मान करण्यासाठी साजरा केला जात आहे
१. (१७९९) म्हैसूरचा वाघ टिपू सुलतान यांचे श्रीरंगपट्टण येथे निधन
म्हैसूरचा एक प्रसिद्ध व पराक्रमी राजा. टिपू याचा अर्थ कन्नडमध्ये वाघ असा होतो. त्यांच्या एकूण स्वभावगुणांवरून हे नाव त्यांना मिळाले
२. (१९२९) प्रख्यात मराठी कादंबरीकार बाबा कदम यांचा जन्म
बाबा कदम हे अत्यंत लोकप्रिय कादंबरीकार आणि कथाकार होते. जवळपास सत्तर कादंबऱ्या, वीसहून जास्त कथासंग्रह त्यांच्या लेखणीतून उतरले आहेत. त्यांनी अध्यात्माविषयी लिखाणही केल होत
त्यांच्या कथा, कादंबर्यात ऐतिहासिक पार्श्वभूमी, संस्थानिक गढ्या, वाडे, सरंजामी सदर बोली भाषा, पोलीस, कायदा, कोर्ट, रेसकोर्स यांचा उल्लेख प्रामुख्यानं आला
पोलीस, वकील म्हणून काम करत असताना त्यांनी मानवी स्वभावाचे अनेक पैलू बघितले आणि आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून ते प्रभावीपणे मांडले. त्यांच्या ‘भालू’सारख्या कादंबऱ्यांवर सिनेमेही बनले
आधार, अजिंक्य, इस्टेट मॅनेजर, बदला, भालू, निर्मला, पद्मजा, पिकनिक, प्रतीक्षा, राही, राजधानी, राजलक्ष्मी, सकीना, साकी, सन्ना, सरला यांसारखी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत
३. (१९३४) भावगीत गायक अरुण दाते यांचा जन्म
'भातुकलीच्या खेळामधली', 'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे', 'शुक्रतारा मंद वारा' अशा हळुवार व सुरेल गीतांनी मराठी रसिकांच्या अनेक पिढ्यांवर त्यांनी अधिराज्य केले
४. (१९४२) विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लगार सॅम पित्रोदा यांचा जन्म
दूरसंचार अभियंते, संशोधक, विकासकांचे मार्गदर्शक आणि प्रवर्तक. सॅम यांची १९८७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे सल्लगार म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९८९ मध्ये भारतीय दूरसंचार आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. दूरसंचार विषयक कायदे आणि त्यांचा सर्वांगीण विकास या सर्व गोष्टींची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली. भारताचे राष्ट्रीय दूरसंचार धोरण ठरविण्यात पित्रोदा यांचे मोठे योगदान आहे. भारताच्या दूरसंचार क्रांतीचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात विशेषतः त्यांच्यामुळेच सर्वव्यापक पीतवर्णी सार्वजनिक दूरध्वनी सेवाकेंद्राच्या रूपात सबंध भारतात स्वस्त आणि सुलभ अंतर्गत विदेश दूरध्वनी सेवा उपलब्ध झाली. सी-डॉट प्रत्यक्षात अवतरल्यावर पित्रोदांनी भारतात लहान, ग्रामीण दूरध्वनी कार्यालये उभारली त्याचप्रमाणे जगातील अनेक दुर्गम प्रदेशांमध्ये दूरध्वनींचे जाळे पसरविले. सी-डॉट यंत्रणा व्हिएटनाम, बांगला देश, नेपाळ, इथिओपिया, घाना व युगांडा यांसारख्या जगातील २२ देशांना दूरध्वनिसाहित्य निर्यात करते. शासकीय सेवा सोडल्यानंतर सॅम पित्रोदा शिकागोला गेले आणि त्यांनी संगणक व इतर संगणकीय साधने यांच्या उत्पादनावर विशेष भर दिला
५. (१९४५) तामिळनाडू येथील ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांचा जन्म
एक भारतीय पत्रकार, द हिंदू या समुहाच्या प्रकाशनाचे नियंत्रक आहेत. राम हे १९७७ पासून द हिंदूचे व्यवस्थापकीय-संचालक होते आणि २७ जून २००३ ते १८ जानेवारी २०१२ दरम्यान ते मुख्य संपादक सुद्धा होते. फ्रंटलाइन, द हिंदू, बिझिनेस लाइन आणि स्पोर्टस्टार या हिंदु समूहाच्या अन्य प्रकाशनांच्या अध्यक्षपदी सुद्धा राम यांनी काम केले आहे. त्यांना भारत सरकारचा 'पद्मभूषण' पुरस्कार आणि श्रीलंकेचा 'श्रीलंका रत्न' पुरस्कार प्रदान केला गेला आहे. त्यांनी राफेल विमान खरेदी प्रकरणावर केलेली पत्रकारिता अभ्यासणे सारखी आणि मोदी सरकारचा भ्रष्टाचार उघड करणारी होती
६. (१९८०) आधुनिक कवी, चतुरस्त्र लेखक, पत्रकार आणि नाटककार पद्मश्री अनंत कानेकर यांचे निधन
'प्रभात'च्या 'माणूस' चित्रपटाचे ते संवादलेखक होते. तसेच नाट्यमन्वंतर या नाट्य संस्थेचे संस्थापक सदस्य होते
७. (१९९५) अथक प्रयत्नानंतर ०४ मे १९९५ रोजी मुंबई शहराचे बॉम्बे वरून मुंबई नामकरण करण्यात आले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment