दिनविशेष २८ मे

दिनविशेष

दि. २९ मे

* जागतिक पचन स्वास्थ्य दिन

जागतिक पचन स्वास्थ्य दिन दरवर्षी २९ मे रोजी साजरा केला जातो. अन्नाचे पचन व्यवस्थित झाले तरच स्वास्थ्य व्यवस्थित राहते. आपली पचन क्रिया स्वास्थ्य असेल तर आपले आरोग्य देखील स्वास्थ्य राहते. कारण ९० टक्के आजाराचे मूळ कारण पचन क्रियांशी संलग्न असते. मनुष्याचे शरीर स्वास्थ्य तेव्हाच राहते जेव्हा पचन व्यवस्थित असेल. जेव्हा शरीर आणि मन हे दोन्ही व्यवस्थित असतात तरच आपण आपली नेहमीची कामे नीट, व्यवस्थितपणे आपण करू शकतो

१. (१९१४) एव्हरेस्टवीर शेर्पा तेनसिंग नोर्गे यांचा जन्म

ते एडमंड हिलरीबरोबर एव्हरेस्ट या जगातील सगळ्यात उंच पर्वत-शिखरावर सर्वप्रथम यशस्वी चढाई करणारे शेर्पा नेपाळी गिर्यारोहक होते. नामग्याल वांगडी असं त्यांचं जन्मनाव आहे. मात्र, त्यांना तेन्झिंग नोर्गे म्हणूनच ओळखले जाते. २९ मे १९५३ रोजी त्यांनी जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवर सर एडमंड हिलरी यांच्यासह पाऊल ठेवले

२. (१९८७) भारतामधील शेतकरी बांधवांचा आवाज, शेतकरी बांधवांच्या प्रश्नांकडे आवर्जून लक्ष देणारे लोकनेते तसेच भारताचे पाचवे पंतप्रधान 'चौधरी चरण सिंग' यांचे निधन

चरण सिंग यांनी ब्रिटिश सरकारपासून स्वातंत्र्य मिळविण्याच्या अहिंसक संघर्षात महात्मा गांधींचे अनुसरण केले आणि बऱ्याच वेळा तुरुंगवास भोगला. १९३० मध्ये मीठाच्या कायद्याच्या उल्लंघनासाठी त्यांना ब्रिटिशांनी ६ महिन्यांसाठी तुरूंगात पाठविले

शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी केलेल्या कामाबद्दल २३ डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस दरवर्षी भारतात किसान दिन म्हणून साजरा केला जातो

३. (२०१०) समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, लेखक, विरोधी पक्षनेते व विधान परिषदेचे माजी सभापती गणेश प्रभाकर तथा  ग. प्र. प्रधान यांचे निधन

प्रधानांनी मराठी व इंग्रजीत विपुल प्रमाणात प्रासंगिक लेखन केले आहे. ते साधना साप्ताहिकाचे मानद संपादक होते. साने गुरुजींचे ते वारसदार समजले जातात. विविध सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असे


#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर