दिनविशेष २७ मे

दिनविशेष

दि. २७ मे

१. (१९३५) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्‍नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे निधन

बाबासाहेब आंबेडकरांचे रमाबाईंवर निस्सीम प्रेम होते. त्यांचे कष्ट पाहून त्यांचे मन तुटायचे. त्यांनी आपल्या रामूला पाठवलेल्या पत्रात त्यांच्या या भावना प्रतिबिंबित व्हायच्या. ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या ‘प्रिय रमा’ला अर्पण केला

२. (१९३८) 'कोसला' कार डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा जन्म

ते परखड लेखन, कोणाचीही भीड न ठेवता टीका करणे, आपल्या साहित्याने जनमानस ढवळून काढणे आणि तितक्‍याच जोरकसपणे सार्वजनिक जीवनात स्पष्ट मते व्यक्त करून प्रसंगी वादाला तोंड फोडणारे प्रसिद्ध मराठी लेखक व टीकाकार आहेत

भालचंद्र नेमाडे यांची ’कोसला’ ही पहिली कादंबरी प्रसिद्ध होण्यापूर्वीच त्यांच्या कविता ’छंद‘, ’रहस्यरंजन‘, ’प्रतिष्ठान‘, ’अथर्व‘ यामधून प्रसिद्ध झाल्या होत्या

हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ही कादंबरी भरपूर प्रसिद्ध झाली. ’हिंदू‘वर प्रचंड टीकाही झाली आणि भरभरून स्वागतही झाले. पिढ्यांमागून आलेल्या पिढीमध्येही लोकप्रियता टिकवून असलेले नेमाडे हे त्यांच्या साहित्यातील बंडखोर वृत्ती, साक्षेपी आणि परखड लेखन, वस्तुनिष्ठतेला अग्रक्रम आणि लोकभाषेतून साहित्यरचना यामुळेच वाचकांना आपलेसे वाटतात

३. (१९६४) भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे निधन

नेहरूंनी १९५० च्या दशकात संसदीय लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार केला आणि आधुनिक राष्ट्र म्हणून भारताच्या प्रतिमेवर जोरदार प्रभाव पाडला. आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये त्यांनी भारताला शीतयुद्धाच्या दोन गटांपासून मुक्त केले. एक प्रतिष्ठित लेखक असलेल्या नेहरुंची तुरुंगात लिहिलेली पुस्तके, जसे की लेटर्स फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर (१९२९), ॲन ऑटोबायोग्राफी (१९३६) आणि द डिस्कव्हरी ऑफ इंडिया (१९४६) ही जगभरात वाचली जातात


४. (१९९४) विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे निधन

ते मराठी लेखक, कोशकार व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते. अस्पृश्यता निवारण, विधवांचे पुनर्विवाह, अशा सामाजिक प्रश्नांवर जोशी यांनी काम केले. महात्मा गांधी यांच्या अस्पृश्यता निवारण चळवळीत त्यांचे वैचारिक योगदान होते

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर