दिनविशेष २३ मे

दिनविशेष

दि. २३ मे

१. (१८९६) गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक व लेखक केशवराव भोळे यांचा जन्म

केशवराव भोळे १९२६ साली पुण्यात आले. गायक म्हणून कारकिर्दीस सुरुवात केलेल्या भोळ्यांनी गाण्यांना चाली बांधणेही आरंभले. १९३१ सालाच्या सुमारास मराठीत बोलपटांचे प्रमाण जसजसे वाढू लागले, तसतसे प्रसंगाच्या मांडणीस व पात्ररचनेस सुसंगत व उठावदार संगीत देण्याचे प्रयोग होऊ लागले. भोळ्यांनी त्या दृष्टीने सांगीतिक प्रयोग करून पाहिले. पार्श्वगायनाचा पहिला प्रयोग त्यांनी 'कृष्णावतार' या चित्रपटामध्ये केला. प्रभात फिल्म कंपनीमध्ये असताना त्यांनी 'अमृतमंथन', 'माझा मुलगा', 'संत तुकाराम', 'कुंकू' इत्यादी चित्रपटांना संगीत दिले


२. (२०१४) मराठी चित्रपट आणि मराठी नाटकांचे मराठी संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद मोडक यांचे निधन

ते त्यांच्या प्रायोगिक शैलीसाठी प्रसिद्ध होते. लपंडाव (१९९३), चौकट राजा (१९९१), तू तिथे मी (१९९८), नातीगोती (२००६), हरिश्चंद्राची फॅक्टरी (२००९), समांतर (२००९) आणि डॅॅंबीस (२०११) हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट आहेत. रंगमंचावर व नाटकांमध्ये महानिर्वाण, महापूर, खेळीया, रायगडाला जेव्हा जाग येते, बेगम बर्वे, चौकट राजा (चित्रपट), आणि मुक्ता ह्यांना त्यांचे पार्श्वसंगीत होते

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर