दिनविशेष २१ मे

दिनविशेष

दि. २१ मे

* दहशतवाद विरोधी दिवस

* जागतिक चहा दिवस

भारताच्या शिफारशीवरून संयुक्त राष्ट्राने (UN) २१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून घोषित केला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेतील चहाच्या योगदाविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी भारताने दिलेल्या या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिली. युएनच्या मते, २१ मे हा आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून घोषित केल्याने त्याचे उत्पादन आणि वापर वाढविण्यासाठी मदत मिळेल

१. (१९९१) भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे निधन

हा दिवस दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळला जातो

राजीव गांधीच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामांतून पहायला मिळाला. संगणक युगाची त्यांनी भारताला ओळख करून दिली. तसेच टेलिकॉमच्या क्रांतीची सुरुवात ही त्यांच्या धोरणांतून झाली


२. (१९२८) ख्यातनाम चित्रसमीक्षक, नाट्यभ्यासक, कलासमीक्षक व लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा जन्म

ते मराठी भाषेतील लेखक, समीक्षक होते. मौज, साधना वगैरे मासिकांतून यांचे बरेच नाट्यविषयक लिखाण प्रसिद्ध झाले आहे. मराठी व इंग्रजी भाषेतून कलासमीक्षेच्या क्षेत्रात त्यांनी पन्नासहून अधिक वर्षे कामगिरी केली. कला व नाट्य क्षेत्रातील आस्वादपर समीक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या कलासमीक्षण लेखांना जगभरातून सन्मान मिळाले. फ्रान्स सरकारने कलाक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार देऊन १९८६ साली तर ब्रिटिश सरकारने १९९४ साली त्यांना गौरवचिन्ह बहाल केले

३. (१९३१) हिंदी कवी, लेखक व उपहासकार शरद जोशी यांचा जन्म

हिंदी भाषेतील उपहासात्मक लेखनाला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या लेखकांमध्ये शरद जोशी यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या रचनांमध्ये समाजात असणाऱ्या विसंगती वर भाष्य करण्यात आलेले आहे 

४. (२०२१) चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदर लाल बहुगुणा यांचे निधन

ते एक प्रख्यात भारतीय पर्यावरणवादी असून चिपको आंदोलनाचे प्रणेते होते. महात्मा गांधींच्या तत्त्वांना अनुसरून सुंदरलाल बहुगुणा यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध लोकांना एकत्र केले. त्यासाठी त्यांनी हिमालयातील जंगले आणि आणि पर्वतांमधून ४ हजार सातशे किलो मीटरचा पायी प्रवास केला. त्यावेळी मोठ्या प्रकल्पांमुळे हिमालयातील नाजुक पर्यावरणावर होणारे गंभीर दुष्परिणाम त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे खेड्यांतील लोकांच्या जीवनावर होणारा परिणामही त्यांनी जवळून अनुभवला. यातूनच १९७३ साली चिपको आंदोलनाची सुरुवात झाली. हिमालयाच्या पायथ्याच्या प्रदेशात असणाऱ्या जंगलातील झाडे व्यापारी उद्देशाने मोठ्या प्रमाणात तोडली जाणार होती. त्या विरोधात चंडीप्रसाद भट्ट आणि सुंदरलाल बहुगुणा यांनी मोठे आंदोलन उभे केले. जंगले व झाडे वाचवण्यासाठी सुंदरलाल बहुगुणांनी दुर्गम भागांतील खेड्यापाड्यांतील जनतेला झाडे तोडण्यासाठी आलेल्या कामगारांना थोपवण्यासाठी झाडांना मिठी मारून चिपकण्याची कल्पना दिली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी चर्चा करून त्यांनी १९८० साली वृक्षतोडीवर १५ वर्षांची बंदी आणली

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर