दिनविशेष ११ मे

दिनविशेष

दि. ११ मे 

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन

भारताने केलेल्या अणुचाचणीने आपल्या तंत्रज्ञानातील प्रगती जगाला दिसून आली. या प्रगतीचे प्रतीक म्हणून ११ मे हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो

आजच्या दिवशी ११ मे १९९८ रोजी भारताने माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय लष्कराच्या पोखरण चाचणी क्षेत्रात शक्ती- १ या आण्विक क्षेपणास्त्रााची यशस्वी चाचणी केली


* ११ मे १८८८ (दिनविशेष)

मुंबईतील हजारो कामगारांनी भायखळ्याला समाज क्रांतीकारक ज्योतिबा फुले यांना "महात्मा" ही पदवी दिली. जोतीरावांच्या ६१ वर्ष पूर्तीनिमित हा समारंभ आयोजित केला होता. नारायण मेघाजी लोखंडे, रावबहादूर वंडेकर आदींनी पुढाकार घेवून हा कार्यक्रम आयोजित केला होता

१. (१९१२) लेखक आणि पटकथालेखक सदाअत हसन मंटो यांचा जन्म

ते एक संवेदनशील, प्रतिभाशाली उर्दू साहित्यिक होते. त्यांनी अडीचशे पेक्षा जास्त कथा, शेकडो श्रुतिका, स्मृतिचित्रे, कादंबरी, अनुवाद, अनेक लेख व निबंध लिहिले. त्यांच्या लेखनात जीवनातील संघर्ष, जाणिवा यांचे उघडपणे दर्शन होते. त्यांच्या आयुष्यातील भळाळती जखम म्हणजे भारत-पाकिस्तान फाळणी. दोन्ही देशांतील दंगली, जाळपोळ, हिंसा, धर्मांधतेने व्यथित केले. या काळातील वेदनामय घटना त्यांनी कथांमधून व्यक्त केल्या आहेत. समाजातील घटनांचे सत्य आणि विद्रूप त्यांनी निर्भीडपणे मांडले

त्यांची कथा भारताची फाळणी, समाजातील दारिद्ऱ्य, वेश्यावृत्ती, इत्यादी विषयांच्या आसपास फिरते. लिखाणातील अश्लीलतेच्या आरोपावरून त्यांना हिंदुस्थानच्या फाळणीपूर्वी व फाळणीनंतर असे एकूण सहा वेळा तुरुंगातही जावे लागले, परंतु त्यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. आपल्या ४२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी एकूण २२ कथासंग्रह, एक कादंबरी व इतर साहित्य लिहिले

२. (१९१४) संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणार्‍या गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्‍ना भोळे यांचा जन्म

त्या मराठी रंगभूमीवरील पहिल्या अभिनेत्री होतं. आंधळ्यांची शाळा या नाटकाद्वारे त्यांनी पदार्पण केले. अभिनयासह ज्योत्स्ना भोळे यांना गायन व साहित्याची ही आवड होती. त्यांनी आराधना या नाटकाचे लेखन केले

३. (१९६०) अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म

ते एक मराठी नाट्य अभिनेते तसेच हिंदी, मराठी भाषांतील चित्रपटांत काम करणारे अभिनेते होते. सामाजिक जाणिवेतून सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या संस्था-संघटानांशीही अमरापूरकरांचा संबंध होता. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी 'लग्नाची बेडी' या नाटकाचे गावोगावी प्रयोग झाले होते. त्या नाटकात सदाशिव अमरापूरकर भूमिका करत असत

मेधा पाटकरांच्या नर्मदा आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. वर्ध्याच्या गांधी आश्रमात ते नेहमी जात. अभय बंग, बाबा आढाव, नरेंद्र दाभोलकर आदी सामाजिक कार्यकर्ते यांच्याशीही अमरापूरकरांचे जिव्हाळ्याचे नाते होते. अमरापूरकरांनी श्याम बेनेगल यांच्या 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या दूरचित्रवाणी मालिकेत महात्मा फुले यांची भूमिका केली होती

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर