दिनविशेष १० एप्रिल

दिनविशेष

दि. १० एप्रिल

१. (१९०१) अर्थशास्त्रज्ञ, सहकारी चळवळीचे खंदे समर्थक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. धनंजय गाडगीळ यांचा जन्म

धनंजय गाडगीळ हे अर्थतज्ञ होते.त्यांनी भारतात आर्थिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संस्थांची उभारणी केली होती आणि गाडगीळ हे नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष देखील होते

२. (१९०७) नाटककार, चित्रपट दिग्दर्शक आणि पत्रकार मो. ग. रांगणेकर यांचा जन्म

हे मराठी नाटककार, चित्रपट-दिग्दर्शक, पत्रकार होते. यांनी लिहिलेली कुलवधू, आशीर्वाद, नंदनवन, माझे घर, वहिनी इत्यादी नाटके विशेष गाजली. नाट्यविषयक योगदानासाठी इ.स. १९८२ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन यांना गौरवण्यात आले

३. (१९३१) शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांचा जन्म

त्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्या जयपूर घराण्याच्या शैलीत गायन करत असत. त्या एक श्रेष्ठ गायिका होत्या व आदराने त्यांना 'गानसरस्वती' असे संबोधले जात असे

४. (१९३७) मराठीतील ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे निधन

हे मराठीतील आद्य महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे जनक-संपादक, समाजशास्त्रज्ञ, कादंबरीकार, इतिहास संशोधक व विचारवंत होते. महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या कार्यामुळे ज्ञानकोशकार केतकर या नावानेही ते ओळखले जातात

५. (१९६५) शिक्षणमहर्षी आणि कृषक क्रांतीचे जनक, स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे निधन

उच्च शिक्षण घेऊन ते स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. इ.स. १९३६च्या निवडणुकीपश्चात ते शिक्षणमंत्री झाले. स्वतंत्र भारतात ते भारताचे कृषी मंत्री होते


#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर