६. 'लोकवृत्त' ला 23 व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...! 'लोकवृत्त' असाच वृद्धिंगत वाटचाल करत राहो...! - विशाल पवार

६. 'लोकवृत्त' ला 23 व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
'लोकवृत्त' असाच वृद्धिंगत वाटचाल करत राहो...! 
- विशाल पवार


'लोकवृत्त' म्हणजे 'लोकांच्या बातम्या' या शब्दाला सार्थ ठरवत 8 एप्रिल 2000 रोजी, बरोबर 22 वर्षांपूर्वी सातारा येथे सुरू झालेल्या लोकवृत्त न्यूज डिजिटल चॅनेल ने आपली वाटचाल 23 व्या वर्षातही यशस्वीपणे चालू ठेवली आहे. याचे श्रेय पूर्णपणे जाते ते लोकवृत्तचे संपादक, पत्रकार श्री. सुजित आंबेकर यांना. त्यांनी ज्याप्रकारे या चॅनेलची धुरा एकहाती सांभाळली आहे त्यामुळे चॅनेलला जनमानसात एक वेगळीचं ओळख मिळाली आहे. त्यांचा स्वतःचा पत्रकारेतील टाइम्स नाऊ राष्ट्रीय वृत्तवाहिनी व अलजजीरा आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी या वृत्तवाहिन्यांबरोबर काम करण्याच्या अनुभवाचा फायदा चॅनलेला, बरोबरीने चॅनेल पाहणाऱ्या दर्शकांना मिळत आहे.

              पत्रकार श्री. सुजीत आंबेकर

'लोकवृत्त' न्यूज चॅनलचे Lokvrutta News (Link - https://www.facebook.com/lokvrutta?mibextid=ZbWKwL) या इंग्रजी नावाने फेसबुक पेज असून 30 हजार लोकांनी ते पेज लाइक केले असून 1 लाख 30 हजार लोकांनी फॉलो केले आहे. 'लोकवृत्त' न्यूज चॅनलचे बहुतांश काम याच पेज वरून होत असल्यामुळे तुम्ही त्याला प्रथमतः लाइक व फॉलो करा. 'लोकवृत्त' न्यूज चॅनलने आत्ताच गेल्या महिन्यात गुढीपाडव्याला आपली वेबसाईट लॉंच केलेली आहे. ती https://lokvruttanews.com/ अशी आहे. त्यामध्ये विविध प्रकारचे विभाग (सातारा, महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, प्रशासन, संपादकीय, लेख) केलेले असून तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे त्या त्या विभागातील बातम्या वाचू शकता. 'लोकवृत्त' न्यूज चॅनलचे कार्यालय 11 रविवार पेठ, पोवई नाका, सातारा येथे असून तेथील संपर्क क्रमांक 9011051115 हा आहे.

                           वेबसाईट

माझा 'लोकवृत्त' न्यूज चॅनेलशी परिचय अगदी अलीकडचा 2019 पासूनचा. मी विविध प्रकारच्या हिंदी, मराठी, इंग्रजी डिजिटल न्यूज चॅनेलचा चाहता. मी या तीन भाषांमधील विविध न्यूज चॅनेल आवर्जून बातम्या, राजकीय, सामाजिक घडामोडी, राजकीय विश्लेषण यासाठी पाहत असतो. सातारा जिल्ह्यामधील बातम्यांचा डिजिटल न्यूज चॅनेलवर शोध घेत असताना माझी ओळख लोकवृत्त न्यूज चॅनेलशी झाली तेव्हा पासून आतापर्यंत मी या चॅनेल चा नियमित दर्शक आहे. त्यावर मला सातारा जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या घडामोडींची इंत्यभुत माहिती मिळते. त्यामुळे मला राजकीय, सामाजिक घडामोडींचा अभ्यास, आकलन करणे सोपे जाते. तुम्हीही या चॅनेलचे दर्शक होऊन घडणाऱ्या घडामोडींचा अभ्यास, परिस्थितीचे आकलन करू शकता.


'लोकवृत्त' न्यूज चॅनेल हा इतर न्यूज चॅनेलपेक्षा वेगळा आहे. बातम्या देण्याची त्यांची निर्भिडता, कोणीही हात घालू न शकणाऱ्या विषयांना हात घालण्याचे त्यांचे धैर्य हे त्यांना इतर चॅनेलवाल्यांपेक्षा वेगळे बनवते. त्यामुळे आजच्या व्यावसायिक पत्रकारितेच्या युगात उपेक्षितांना तो आपला शेवटचा आधार वाटतो तर बलवानांना त्याचा धाक वाटतो. चॅनेलच्या लोकांनी आजपर्यंत बऱ्याच चांगल्या, वाईट अनुभवांचा सामना केलेला आहे. तरीही त्यांनी आपल्या पत्रकारितेची वाटचाल 22 वर्षात कधीही ढळू दिलेली नाही हेचं त्यांचे श्रेष्ठत्व. ही पत्रकारितेची वाटचाल अशीचं वृद्धिंगत होत राहो अशी प्रार्थना या वर्धापनदिनी करतो. आणि सर्व 'लोकवृत्त' न्यूज चॅनेलच्या सदस्यांना 23 व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो.
धन्यवाद.

- विशाल पवार
संस्थापक अध्यक्ष - VP Creation Satara
                           "प्रसिद्धीतून समृद्धीकडे"
सातारा
(Mob - 9594415115)
दि. 08 एप्रिल 2023

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर