दिनविशेष ५ एप्रिल

दिनविशेष

दि. ५ एप्रिल

राष्ट्रीय समुद्र संपत्ती दिवस

१. (१९०८) शोषितांना आवाज देणारे बिहारचे रहिवासी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांचा जन्म


२. (१९२०) महाराष्ट्राचे माजी नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य डॉ. रफिक झकारिया यांचा जन्म

अल्पसंख्याक समाजाचे पुरोगामी विचारांचे आणि बॅरिस्टर झालेले असे हे डॉ. रफिक झकेरिया. वसंतराव नाईकांच्या मंत्रिमंडळात त्यांनी नगरविकास, आरोग्य यासह अनेक खात्यांचा कारभार हाताळला


३. (१९२०) जगप्रसिद्ध इंग्रजी कादंबरीकार आर्थर हॅली यांचा जन्म

त्यांची हॉटेल, एअरपोर्ट, फ्लाइट इन डेन्जर, डिटेक्टिव या कादंबरी प्रसिद्ध आहेत


४. (१९२२) स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणा याच्या पुरस्कर्त्या, आर्य महिला समाजच्या संस्थापिका पंडिता रमाबाई यांचे निधन

या परित्यक्ता, पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने सतत कार्यरत राहिलेल्या एक मराठी सामाजिक कार्यकर्त्या विदुषी होत्या


#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर