दिनविशेष ४ एप्रिल

दिनविशेष

दि. ४ एप्रिल

१. (१९३३) प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचा जन्म

बापू नाडकर्णी हरहुन्नरी खेळडू असूनही क्रिकेटच्या इतिहासात अजरामर झाले ते त्यांच्या गोलंदाजीच्या पराक्रमामुळे. त्यांच्या गोलंदाजीच्या अनेक कथा आणि किस्से प्रसिद्ध आहेत. बापू आपल्या गोलंदाजीत एकही वेळा चूक करीत नाहीत हिच सगळ्यात मोठी चूक ते करतात असे क्रिकेटचे पंडित म्हणत. कंजूस गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती होती


२. (१९४७) मालवणी भाषेवर निस्सीम प्रेम करणारे व तिला रंगभूमीवर आणून प्रेक्षकांपर्यंत पोहचवणारे विनोदी अभिनेते मच्छिंद्र कांबळी यांचा जन्म

ते नाटककार, निर्माता आणि दिग्दर्शकही होते. त्यांनी मालवणी बोली मराठीत लोकप्रिय केली. ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्षही होते


३. (१९६८) अमेरिकेतील समान नागरी अधिकार चळवळीतील प्रमुख नेते मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर यांचे निधन

ते अमेरिकन नागरी अधिकार चळवळीतील प्रमुख नेते होते. त्यांचा मुख्य वारसा म्हणजे अमेरिकेतील समान नागरी अधिकार. यासाठी ते आज मानवाधिकाराचे प्रतीक म्हणून ओळखले जातात


४. (१९८७) ज्ञानपीठ पारितोषिक विजेते हिंदी लेखक आणि वृत्तपत्रकार सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन उर्फ अज्ञेय यांचे निधन

ते हिंदीमधील आपल्या काळातील सर्वाधिक चर्चित कवी, कथाकार, निबंधकार, पत्रकार, संपादक, प्राध्यापक होते


#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर