दिनविशेष २८ एप्रिल

दिनविशेष

दि. २८ एप्रिल

१. (१९२६) संवाद जीवनाशी नातं सांगणाऱ्या वाचनीय कथांचे लेखक वसंत नरहर फेणे यांचा जन्म

काळ आणि मानवी समाज यांच्यातील नात्याचे बंध उलगडणे हे त्यांच्या कथात्म साहित्याचे एक वैशिष्ट्य मानले जाते. मराठी कथात्म साहित्यात हे वैशिष्ट्य ठळकपणे ज्यांच्या साहित्यात आढळते अशांमध्ये वसंत नरहर फेणे हे प्रमुख नाव. एकोणीसशे साठोत्तरी काळात लिहिते झालेल्या फेणे यांनी गेली सुमारे पाच दशके सकस कथा-कादंबऱ्यांनी मराठी कथात्म साहित्य समृद्ध केले

सर्वसामान्य माणसाचे अनुभवविश्व प्रत्ययकारक रीतीने फेणे यांच्या लेखनातून प्रकट होते. व्यक्तीपेक्षा समूहाला केंद्रस्थानी ठेवणारे हे लेखन मराठी साहित्यामधील प्रवृत्ती प्रवाहांच्या पलीकडे वावरणारे आहे


२. (१९२९) सर्वोत्कृष्ट पोशाख डिझाइनसाठी ऑस्कर चित्रपट पुरस्कार विजेत्या, वेशभूषा डिझाईनर भानु अथैय्या यांचा जन्म

ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या त्या पहिल्या भारतीय कलाकार आहेत. १९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘गांधी’ या चित्रपटासाठी त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला होता

३. (१९३१) लेखक मधु मंगेश कर्णिक यांचा जन्म

१९९० साली रत्‍नागिरीत झालेल्या ६४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे होते. इ.स.१९५० ते १९६५ या काळात मधु मंगेश कर्णिकांनी खूप कथा लिहिल्या. त्यांच्या कोल्हापुरातील वास्तव्यात खऱ्या अर्थाने कर्णिकांच्या लेखनाची सुरुवात झाली. ते महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते 

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर