दिनविशेष २५ एप्रिल

दिनविशेष

दि. २५ एप्रिल 

जागतिक मलेरिया दिन


१. (१९१८) हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचा जन्म

‘श्यामसुंदर’ (१९३२) हा शाहू मोडक यांचा पहिला चित्रपट. हा चित्रपट खूपच गाजला. माणूस या चित्रपटातील त्यांची हवालदाराची भूमिकाही खूप गाजली. संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या भूमिका त्यांनी लीलया साकारल्या

२. (१९८२) २५ एप्रिल १९८२ साली दूरदर्शनच्या रंगीत प्रक्षेपणाला सुरुवात झाली होती. त्यावेळी १९८२ च्या एशियन गेम्सचे प्रक्षेपण झाले होते

३. (१९९९) साहित्यिक पंढरीनाथ रेगे यांचे निधन

मनमोहक गोष्टी, मनोहर कथा, इटुकल्यांसाठी, समुद्र-समंध, चातुर्याची झटापट, ५१ गमतीदार गोष्टी, कासवाची चतुराई, इंद्रधनुष्य, धनगराची मुलगी ही त्यांनी लिहिलेली काही पुस्तके

४. (२०२२) माजी सनदी अधिकारी, केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचे निधन

ऑक्टोबर २०१९ पर्यंत माधवराव गोडबोले यांनी १५ इंग्रजी आणि १० मराठी पुस्तके लिहिली आहेत. ‘चांगले प्रशासन हा मूलभूत हक्क मानला जावा ’ यासाठी त्यांनी नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आधारित A Quest For Good Governance (2004) या पुस्तिकेचे ते सहलेखकही आहेत

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर