दिनविशेष २३ एप्रिल

दिनविशेष

दि. २३ एप्रिल

जागतिक पुस्तक दिन

२३ एप्रिल हा दिवस वर्ल्ड बुक डे म्हणून साजरा करणार असल्याचं युनेस्कोने १९९५ जाहीर केलं. तेव्हापासून हा दिवस 'वर्ल्ड बुक अँड कॉपीराईट डे' म्हणून साजरा केला जातो

२३ एप्रिल हा दिवस विल्यम शेक्सपिअर, मिगेल दे सर्वांतेस, इंका गार्सिलासो डे ला वेगा या प्रसिद्ध लेखकांचा मृत्यूदिन आहे



१. (१५६४) इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते विल्यम शेक्सपियर यांचा जन्म

ते इंग्रजी भाषेतले प्रसिद्ध कवी, नाटककार होते. त्यांना लिहिलेली नाटके व काव्ये इंग्लिश साहित्यात अजरामर आहेत. शेक्सपिअर यांच्या शोकांतिका विशेष नावाजलेल्या आहेत. आणि त्यांचे प्रभाव मराठी साहित्यिकांवर असलेले आपल्याला पाहायला मिळतो

२. (१८५८) समाजसुधारक पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म

परित्यक्ता, पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने सतत कार्यरत राहिलेल्या एक मराठी सामाजिक कार्यकर्त्या म्हणून पंडिता रमाबाई सरस्वती यांचा उल्लेख केला जातो

३. (१८७३) अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म

हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक व लेखक होते. त्यांना कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे व महर्षी शिंदे असेही म्हटले जाते. शिंदे हे मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे त्यागाचे व निष्ठेचे प्रतीक होते. अज्ञानाच्या पूजेविरुद्ध वैचारिक बंड पुकारून जुन्या धार्मिक अनिष्ट परंपरांचे जोखड फेकून देणारे ते सुधारक होते. त्यांनी स्वातंत्र्य समता व बंधुत्व या तत्त्वांसाठी माणसातला माणूस जागा केला मानवाने मानवावर समभावाने प्रेम करावे तसा आचार सर्वत्र घडावा म्हणून आपले जीवन समर्पित करणारे ते कर्मयोगी होते. विद्वत्ता, संयम व सेवावृत्ती या महान आदर्शाचे महामानव म्हणजे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे हे होत. एक समाजसुधारक, अस्पृश्यता निवारणाचे खंदे पुरस्कर्ते, निरनिराळ्या धर्मांतील तत्त्वांचे संशोधक आणि ध्येयवादी विद्वान म्हणून ते ओळखले जात

४. (१९५९) मराठी वृत्तसृष्टीतील धडाडीचे व निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जाणारे निखील वागळे यांचा जन्म

त्यांनी इ.स. १९७७ साली पत्रकारितेस आरंभ केला. इ.स. १९७९ साली ते दिनांक या साप्ताहिकाच्या संपादक झाले. इ.स. १९९० साली त्यांनी महानगर वृत्तपत्राच्या संपादकपदाची सूत्रे हाती घेतली

५. ५. (१९८३) पाटण (जि. सातारा) येथील लोकनेते, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री बाळासाहेब देसाई यांचे निधन

यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे, महसूल, गृह, शिक्षण व कृषी ही मंत्रिपदे केव्हाना केव्हा सांभाळली होती. प्र.के.अत्रेंनी त्यांचा गौरव लोकनेते असा केला होता

६. (१९९२) ख्यातनाम चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सत्यजित रे यांचे निधन

ते ऑस्कर पुरस्कार विजेते भारतीय लेखक, पटकथालेखक, संगीतकार, निर्माते आणि दिग्दर्शक होते. चित्रपट जगतातील त्यांच्या कामगिरीबद्दल इ.स. १९९२ मध्ये त्यांना जीवनगौरव ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. ऑस्कर मिळवणारे ते एकमेव भारतीय दिग्दर्शक आहेत. त्यांनी अपु के वर्ष (इ.स. १९५० ते इ.स. १९५८) व इ.स. १९५५ मध्ये पथेर पांचाली या चित्रपटाची निर्मिती केली. यांनी एकूण ३७ चित्रपटांची निर्मिती केली. ते स्वतःच चित्रपटांना संगीत देत, पटकथा लेखन, दिग्दर्शन व संपादन अशी अनेक कामे करत

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर