दिनविशेष १८ एप्रिल
दिनविशेष
दि. १८ एप्रिल
* भूदान दिन
१८ एप्रिल १९५१ रोजी आचार्य विनोबा भावे यांना पाहिले भूदान मिळाले. पुढे १४ वर्ष ते भूदान मागत भारतभर फिरले. जनतेने त्यांना ४७ लाख एकर जमीन भुदानात दिली. सुमारे ८ लाख भूमिहीनांना ती वितरित केली गेली. भूदान द्वारे विनोबांना हृदयपरिवर्तन व समाज परिवर्तन करायचे होते
* World Heritage Day
* जागतिक वारसा दिवस
आपल्या आधीच्या अनेक पिढ्यांनी उभारलेल्या वास्तूंचे जतन व्हावे ही जनजागृती येणाऱ्या पिढ्यांना व्हावी यासाठी हा आज साजरा करतात
१. (१८५८) स्त्रीशिक्षण आणि विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म
यांनी महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपले १०४ वर्षांचे जीवन वाहिले. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जीवन म्हणजे सामाजिक सुधारणा विशेषतः स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी वाहिलेले आधुनिक ऋषितुल्य जीवन त्यांच्या कार्याचा प्रारंभ हा विधवाविवाह पासून झाला आणि त्याची परिणीती स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विद्यापीठ काढण्यामध्ये झाली. स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांनी अविरत परिश्रम केले धोंडो केशव कर्वे यांचे चिरंजीव र. धो. कर्वे हे होत. त्यांनीदेखील सामाजिक सुधारणेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. भारतामध्येच्या काळात संततिनियमनाच्या प्रश्नांवर बोलणे देखील गुन्हा मानला जात होता अशा या काळामध्ये या संपूर्ण कार्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन लोकांना संततिनियमनाचा महत्त्व पटवून देण्यासाठी र. धो. कर्वे व त्यांच्या पत्नी यांनी अथक परिश्रम घेतले
२. (१८५९) स्वातंत्रसैनिक, सेनापती रामचंद्र ऊर्फ रघुनाथ पांडुरंग येवलेकर उर्फ तात्या टोपे यांचे निधन
ग्वाल्हेरच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईचा पराभव या पार्श्वभूमीवर एकच मराठी वाघ शत्रूला तोंड देत होता. शत्रूवर जरब बसवत, वेळोवेळी इंग्रजांच्या तावडीतून सुटून पुढचे ध्येय गाठण्याचा त्यांचा यत्न इंग्रजांना मेटाकुटीला आणत होता. तात्यांच्या या पराक्रमाची गाथा जगभर पसरली. काही युरोपियन इतिहासकारांनी तात्यांच्या शौर्याचा गौरव त्या काळी केला होता
३. (१९१६) हिंदी व मराठीतील चरित्र अभिनेत्री ललिता पवार यांचा जन्म
खलनायिकेच्या व्यक्तिरेखेला त्यांनी वेगळे परिमाण मिळवून दिले
४. (१९७२) विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, महामहोपाध्याय, भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांचे निधन
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment