दिनविशेष १५ एप्रिल

दिनविशेष

दि. १५ एप्रिल

जागतिक कला दिन 

प्रबोधनकालीन युरोपातील महान कलावंत 'लिओनार्डो द व्हिन्सी' यांचा जन्मदिवस दरवर्षी जागतिक कला दिवस म्हणून साजरा केला जातो

१. (१८९३) चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक यांचा जन्म

ते मराठी प्राध्यापक, प्रकांड पंडित, पत्रकार, चरित्रलेखक, इतिहाससंशोधक, मराठी संत वाङ्‌मयाचे चिकित्सक व साहित्यसमीक्षक होते. न.र. फाटके हे १९३७ साली विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. हैदराबाद येथे १९४७ साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते


२. (१९३२) कवी सुरेश भट यांचा जन्म

सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यामुळे त्यांना 'गझल सम्राट' असे मानाने संबोधले जाते

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर