दिनविशेष १४ एप्रिल
दिनविशेष
दि. १४ एप्रिल
१. (१८९१) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म
२. (१९१४) अभिनेत्री शांता हुबळीकर यांचा जन्म
त्या एक मराठी, हिंदी, कानडी चित्रपट अभिनेत्री, गायिका होत्या. त्यांनी 'माणूस'मध्ये गायलेले आता कशाला उद्याची बात हे गाणे प्रसिद्ध झाले होते. त्यांनी याच नावाने आत्मचरित्र लिहिले आहे
३. (१९२७) विनोदी लेखक द. मा. मिरासदार यांचा जन्म
हे मराठीतले साहित्यिक, कथाकथनकार, विनोदी लेखक, पटकथाकार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष होते. द. मा. मिरासदार ध्वनीक्षेपकासमोर उभे राहून हातवारे करीत बोलू लागले की, श्रोत्यांना एक अद्भुत नाट्य अनुभवायला मिळे
४. (१९४३) वात्रटिकाकार, कवी, पटकथा, लेखक, निर्माते, दिग्दर्शक रामदास फुटाणे यांचा आज रामदास फुटाणे यांचा जन्म
हे महाराष्ट्रातले एक व्यंग्यकवी आणि पटकथा लेखक, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आहेत. रामदास फुटाण्यांच्या कोपरखळ्या मारणाऱ्या छोट्याछोट्या कवितांनी महाराष्ट्रीय वाचकांचे अनेक वर्षे मनोरंजन केले आहे
५. (१९६२) श्रेष्ठ अभियंते भारतरत्न सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचे निधन
भारतात त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment