दिनविशेष १३ एप्रिल
दिनविशेष
दि. १३ एप्रिल २०२२
१. (१८९०) मराठी, भारतीय चित्रपट निर्माते, मराठी चित्रपटांचे आद्य प्रवर्तक रामचंद्र गोपाळ तोरणे तथा दादासाहेब तोरणे यांचा जन्म
२. (१८९५) भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे पद्मभूषण वैद्यकशास्त्रज्ञ वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म
रामजींचा वैद्यकीय वृत्तीसोबतच संस्कृत भाषेचा गाढा अभ्यास होता. त्यांच्याकडे अनेक मूल्यवान आणि दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह होता. कर्करोग आणि कुष्ठरोग यावर त्यांनी तीन पुस्तके आणि शंभरहून जास्त शोधनिबंध प्रकाशित केले आहेत
३. (१९१३) थोर देशभक्त, सत्याग्रही, स्वातंत्र्यसेनानी दत्ताजी ताम्हाणे यांचा जन्म
ते एक थोर देशभक्त स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांच्या जन्मदिनीच म्हणजे १३ एप्रिल १९१९ या दिवशी जालियनवाला हत्याकांड झाले. त्यामुळे पुढे देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत दत्ताजींनी आपला वाढदिवस साजरा केला नाही
४. (१९१९) जालियनवाला बाग हत्याकांड
एप्रिल १३, इ.स. १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,६०० फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. अधिकृत सूत्रांच्या हवाल्यातून या हत्याकांडामधे ४०० लोकांचा मृत्यू झाला. अनाधिकृत सूत्रांनुसार मृतांचा आकडा १,०००हून अधिक आहे
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment