दिनविशेष २९ मार्च
दिनविशेष
दि. २९ मार्च
१. (१९२६) अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचा जन्म
खुमासदार शैलीत विनोदी लेखन करणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध होते. 'माशाचे अश्रू’, ‘गबाळ ग्रंथ', ‘चोर आणि मोर’, ‘बंडल’ असे त्यांचे अनेक विनोदी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत
गाडगीळ यांनी ६० हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांच्या ’लोटांगण’ या पहिल्याच विनोदी कथासंग्रहाला पु.ल. देशपांडे यांच्या 'अपूर्वाई' या पुस्तकाबरोबर राज्य सरकारचा पुरस्कार विभागून मिळाला होता. ’एकच प्याला, पण कोण?’, ’अखेर पडदा पडला’, ’फिरकी’, ’वशिल्याचा तट्टू’ अशा अनेक पुस्तकांनाही लोकप्रियता मिळाली होती. 'सिगरेट व वसंतऋतू’ या त्यांच्या प्रवासवर्णनाला राज्य सरकारचे पहिले पारितोषिक मिळाले. याखेरीज दोन विनोदी कादंबऱ्या, व्यक्तिचित्रे, टीकाग्रंथ, भाषांतर तसेच बालवाङमय हे प्रकारही त्यांनी हाताळले. ’वळचणीचं पाणी’ हे बाळ गाडगीय यांचे आत्मचरित्र आहे
२. (१९२९) रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त यांचा जन्म
३. (१९४८) साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू नागनाथ कोतापल्ले यांचा जन्म
हे मराठी भाषेतील लेखक, कवी, व समीक्षक होते. राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष होते. तसेच चिपळूण येथे झालेल्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment