५. VP Creation Satara, निर्मिती व प्रसिद्धी संस्थेची आगामी काळातील भूमिका - विशाल पवार
नमस्कार,
मी विशाल पवार , संस्थापक अध्यक्ष VP Creation Satara निर्मिती व प्रसिद्धी संस्था, २५ ऑगस्ट २०२० रोजी मी व माझा सहकारी गणेश शिंदे व आमच्या टीमने VP Creation Satara या संस्थेची सुरूवात केली. २५ ऑगस्ट २०२१ रोजी या संस्थेला १ वर्ष पूर्ण झाले. गेल्या वर्षभरातील आमची वाटचाल कोवीडचा काळ असून सुद्धा समाधान कारक झालेली आहे. या कामगिरी बद्दल आमची सर्व टीम आनंदी आहे.
गेल्या दीड वर्षापासून कोविड या आजारामुळे आपल्या सर्वांचेच जीवन विस्खळित झाले आहे. या काळात लोकांना अत्यावश्यक गरजांची पूर्तता करताना सुद्धा तंत्रज्ञानाचा वा नवीन गोष्टींचा उपयोग करावा लागला. त्यामध्ये पैसे काढण्यासाठी नवनवीन मोबाईल ॲप, भाजीपाला किराणा मिळवण्यासाठी ऑनलाइन डिलीवरी या व अनेक गोष्टींचा वापर लोकांनी कोरोना काळात केला. या काळात इंटरनेट व सोशल मिडीयाचा वापर विविध कारणांसाठी मोठ्या प्रमाणात करण्यात आला. उदा. जाहिरात, वस्तू खरेदी करणे, घरून काम करणे या सर्व गोष्टींचा मी व आमच्या टीमने अभ्यास केला. आज भारतातील कोट्यावधी लोकांच्या कडे स्मार्टफोन आहेत आणि त्याचा वापर ते विविध कारणांसाठी करतात. येणारे १० वर्षाचे (२०२१ ते २०३०) युग हे सोशल मिडीयाचे युग राहणार आहे. याचा सर्वांगीण विचार करून आम्ही VP Creation Satara या डिजीटली आणि सोशल मिडीया संस्थेची निर्मिती केलेली आहे.
संस्थेच्या वर्षभराच्या काळाबद्दल सांगायचे झाल्यास, आम्ही ही संस्था सुरू केल्यानंतर (#व्यवसाय क्षेत्रातील)
आमच्यावर पहिला विश्वास दाखवला तो सातारा जिल्ह्यातील हॉटेल क्षेत्रातील प्रसिद्ध असणारा ब्रँड Shivraj Dhaba Karad यांनी. आमचं काम चालूचं झालं होतं, आम्ही आमचे बनविलेले ग्राफिक्स, व्हिडीयो व इतर साहित्य सोशल मिडीयावर पोस्ट करायचो. ते साहित्य शिवराज ढाबा कराड या हॉटेलच्या व्यवस्थापन मधील एक व्यक्ती श्री. Santosh Gaikwad यांनी पाहिले. त्यांनी आम्हाला आमचे काम करणार का याबद्दल विचारणा केली. एवढा मोठ्या ब्रँड सोबत सुरूवात केल्या केल्याचं काम करायला भेटणे आमच्यासाठी फारचं आनंददायी होते. आमच्या टीमने लगेच त्यांना होकार कळवला. आणि पुढील बोलणीच्या बैठकीसाठी आम्ही कराडला मुख्य शाखेत त्यांना भेटायला गेलो. तेथे आम्ही शिवराज ढाब्याचे मालक श्री. नामदेव थोरात यांना भेटलो. त्यांनी आम्हाला कामाबद्दल आणि कामाच्या नियोजना बद्दल विचारणा केली. आम्ही सर्व कामाचे नियोजन त्यांच्यापुढे मांडले आणि त्यांना ते पसंद पडले. पुढील बोलणी करून काम पक्के झाले. अशाप्रकारे आमचे व्यवसाय क्षेत्रातील पहिले ग्राहक #शिवराज_ढाबा_कराड यांच्यासोबतचा आमचा प्रवास सुरू झाला आणि आत्ताही तो यशस्वीपणे सुरू आहे. यामध्ये श्री. संतोष गायकवाड यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला. त्याबद्दल आमची टीम त्यांची ऋणी आहे. याबरोबरच व्यवसाय क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारे निखील सकुंडे श्री. दत्तात्रय स्वामी कलेक्शन अंबवडे, श्री. परवेज इनामदार कोहिनूर चिकन शॉप पळशी, श्री. प्रथमेश पाटील पाटील कन्स्ट्रक्शन, श्री. दिपक पोरे, श्री. गणेश ठोंबरे, श्री. सौरभ चव्हाण या व्यावसायिकांनी आम्हाला काम करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.
दुसरं क्षेत्र #राजकारण या क्षेत्रामध्ये गेल्या ४ वर्षापासून कार्यरत असल्यामुळे अनेक लोकांशी संपर्क होताचं त्याचा फायदा काम करताना झाला. राजकारण क्षेत्रामध्ये माझ्यावर विश्वास दाखवणारे लोक पूर्ण महाराष्ट्रातून आहेत. त्यामध्ये उल्लेख करता येईल, श्री. भीमराव पाटील (काका) विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सातारा, माजी सभापती सातारा जिल्हा परिषद, सौ. धनश्रीताई महाडिक जिल्हाध्यक्षा सातारा जिल्हा महिला काँग्रेस, सौ. सुषमाताई राजेघोरपडे उपाध्यक्षा सातारा जिल्हा महिला काँग्रेस, श्री. नाजिम इनामदार सरचिटणीस सातारा जिल्हा काँग्रेस, श्री. श्रीकांत चव्हाण अध्यक्ष कोरेगाव तालुका काँग्रेस, श्री. राजाराम देशमुख, श्री. रमेश भवार, तसेच मला या लोकांशी समन्वय साधण्यासाठी मदत करणारे श्री. जयवंत घोरपडे, श्री. दत्तात्रय साळुंखे, श्री. अमर गोडसे यांचाही उल्लेख मी याठिकाणी करू इच्छितो. तसेच ग्रामपंचायत वेळी मला संधी देणारे ग्रामपंचायत वाठार (कि), ग्रामपंचायत शिवथर, ग्रामपंचायत गोळेश्वर येथील सदस्यांचे व पदाधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो.
तिसरे क्षेत्र #मनोरंजन. मनोरंजन क्षेत्राचा विचार करायचा विचार झाल्यास आम्ही वर्षभराच्या काळात कला व मनोरंजन क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या व कलाकारांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यामध्ये आम्हाला Arun Kunder सर, Pradeep Tawate सर, ह.भ.प सचिन महाराज सर, Shreyash Shinde , Prajwal Herole यांची खूप मदत झाली. या क्षेत्रात आम्ही कलाकारांसाठी व इतर लोकांसाठी (PR) चे काम करण्यास उत्सुक आहोत. याबद्दल आमचे काही लोकांशी बोलणे चालू आहे. आम्ही लवकरचं काम करण्यास सुरू करू याबद्दल आम्हाला आशा आहे. कला व मनोरंजन क्षेत्रात केल्या जाणाऱ्या जाहिरात, लघुपट व इतर गोष्टींची आमच्या सर्व प्रकारच्या कामात गरज लागत असल्यामुळे आमची टीम ते जास्तीत जास्त चांगले करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याचा फायदा आम्हाला सर्वचं क्षेत्रांत होणार आहे.
VP Creation Satara ही संस्था (डिझाईन, फोटोग्राफी, व्हिडीयोग्राफी, इव्हेंट मॅनेजमेंट) या प्रकारामध्ये (व्यवसाय, राजकारण आणि मनोरंजन) ह्या क्षेत्रांमध्ये आगामी काळात कार्यरत राहणार आहे. व्यवसाय, राजकारण आणि मनोरंजन हे क्षेत्र निवडायचे कारण की, या क्षेत्रातील काम कधीचं थांबत नाही. ती निरंतर चालू राहतात. याचा प्रत्यय आपणाला कोविडचा काळातही आलेला आहे.
या टीममध्ये काम करणाऱ्या श्री. गणेश शिंदे, श्री. राजू पाटील, श्री. विठ्ठल शिंद, श्री. आकाश सकुंडे, श्री ऋषीकेश मोरे या सर्व सहकाऱ्यांचे मी संस्थापक अध्यक्ष या नात्याने आभार मानतो. आणि तुमचे सहकार्य मला असेचं आगामी काळात मिळेल याबद्दल आश्वस्त राहतो. या प्रवासात आम्हाला Sachin Pisal Tejasvi Sachin Pisal Ajay Sakunde Datta Dhumal Shripad Atole Rajesh Kadam Vinod Salunkhe Archana Salunkhe Sharadchandra Rajeghorpade यांचे सहकार्य लाभले.
मी त्यादिवशी व्हिडीयो मध्ये म्हणालो होतो की, मी या संस्थेत पूर्णवेळ कार्यरत असणार आहे. हे अशासाठी की, बऱ्याचं लोकांना वाटतयं मी दुसरही काही काम करतो. पण मी दुसरं कोणतंही काम गेल्या वर्षभरापासून करत नसून या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने ही संस्था कशी पुढे नेता येईल आणि कशी जास्तीत जास्त कशी प्रसिद्धी पावेल याबद्दलचं काम करत आहे.
आणखी एक सांगायची गोष्ट, माझे पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण झालेले आहे. मी पत्रकारितेची पदवी मिळवलेली आहे. बऱ्याचं लोकांना असं वाटतयं की मी पत्रकारिता करतो, पण तसं नाही. मी पत्रकारिता करत नाही. पण मी जे काही पत्रकारितेतं शिकलोयं त्याचा उपयोग व्यवसाय, राजकारण, मनोरंजन क्षेत्रात केला जातो. त्या शिक्षणाचा उपयोग करून मी या क्षेत्रातील लोकांना सेवा देत आहे. आज मी माझ्या संस्थेच्या माध्यमातून ४ लोकांना रोजगार देतो. आणि भविष्यात अजून लोकांना काम देण्याचा विचार आहे.
तरी माझी ओळख ही आता तरूण उद्योजक म्हणूनच करण्यात यावी अशी माझी इच्छा आहे. बाकी भूतकाळातील कोणत्याचं गोष्टींचा विचार केला जाऊ नये.
✍️ विशाल पवार.
संस्थापक अध्यक्ष, VP Creation Satara
दि. २८ ऑगस्ट २०२१
ठिकाण - सातारा
Comments
Post a Comment