दिनविशेष २७ डिसेंबर
दिनविशेष
दि. २७ डिसेंबर
★ घटना
१. (१९४५) जगभरातील २९ देशांनी केलेल्या करारानुसार जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) यांची स्थापना करण्यात आली
◆ जन्म
१. (१७९७) सुप्रसिद्ध उर्दू शायर मिर्झा गालिब यांचा जन्म
ते एक प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी होते. ते सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कर्मठ नसलेले, नमाज न पढणारे, रोजा न ठेवणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते. गालिबच्या काव्यावर मीर आणि आमीर खुसरो यांच्या रचनांचा प्रभाव होता. साहित्य निर्मिती करताना केवळ चौकट मोडून चालत नाही. त्यात तितकी ताकदही असावी लागते. गालिबने परंपरेला नावीन्याची झालर लावली. अभिजात सौंदर्याची बूज राखायला शिकवले. घराण्यातच सैनिकी पार्श्वभूमी असल्याने गालिब यांच्या मध्ये बंडखोरीचे बीज होते
२. (१८९८) स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जन्म
शेतक-यांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली. शिक्षण, शेती, सहकार, अश्पृश्योद्धार, जातीभेद निर्मुलन, इ. विविध क्षेत्रात त्यांनी माेठे कार्य केले
उच्च शिक्षण घेऊन ते स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. इ.स. १९३६ च्या निवडणुकीपश्चात ते शिक्षणमंत्री झाले. स्वतंत्र भारतात ते भारताचे कृषीमंत्री होते. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजे १,००० च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी, तसेच पदविका तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय अशी अनेक महाविद्यालये सुरू करून त्या संस्था शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान देत आहेत
३. (१९०४) नाटककार आणि नाट्य समीक्षक वसंत रामचंद्र देसाई यांचा जन्म
वसंत देसाई यांना संगीतात लहानपणापासून अतोनात रस असल्यानं उस्ताद इनायत खान आणि डागर बंधू यांच्याकडून त्यांनी शास्त्रोक्त संगीताची तालीम घेतली. त्यांच्या स्वररचनेवर रागसंगीताचा फार प्रभाव आहे, याचं मूळ इथं सापडतं. पुढे त्यांना तरुण वयात प्रभात कंपनीत, गोविंदराव टेबे यांच्या हातखाली सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि ते प्रभातमध्ये स्थिरावले. इथं त्यांना व्ही. शांताराम भेटले. नंतर व्ही. शांतारामांनी प्रभातपासून वेगळं व्हायचा निर्णय घेतला, तेव्हा वसंत देसाई यांना भरपूर संधी मिळाल्या. या दोघांना प्रभातचा वारसा मिळाला होता
वास्तववादी चित्रपटनिर्मितीत ज्याचा उद्भव होतो, त्या संगीतावर भर असल्यानं विविध आणि वास्तव ध्वनी-उगम वापरण्यावर देसाई यांचा कटाक्ष होता. उदा., ‘दो आँखे बारा हाथ’ या चित्रपटातील ‘सैय्या झुठो का बडा सरताज निकला’ या गाण्यात ‘रावणहथ्था’ या लोकवाद्याचा समर्पक उपयोग केला आहे. तसंच या चित्रपटातील ‘ऐ मालिक तेरे बंदे हम’ या गीतात योजलेला लयबंध वाऱ्यानं उघडझाप करणाऱ्या खिडकीतून पुरवला जातो
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment